टीम इंडियाने सलग 11 व्यांदा टाॅस हरला, बांगलादेशविरुद्ध 3 विकेट घेतल्या तर मो. शमी करेल 'हा' विक्रम!
Ind vs Ban Live streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने करण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ भक्कम दिसत आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. पण आज झालेली नाणेफेक भारतीय संघाने हरली आणि याचबरोबर भारतीय संघाने सलग अकराव्यांदा नाणेफेक हरण्याचा नको असलेला विक्रम केला आहे.
भारतीय संघ विजयी वाटचाल जरी करत असला तरीही नाणेफेक साथ देत नाही अशी स्थिती आहे. कारण सलग अकराव्यांदा भारतीय संघाचा कप्तान टाॅस हरला आहे. यापुर्वीच्या मालिकेतही असेच प्रकार घडले आता आगामी सामन्यात काय होते याची उत्सुकता आहे.

..तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला सुरुवातीलाच दोन हादरे दिले आहेत. मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले असून टीम इंडिया या मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
बांगलादेश संघाला कमी लेखता येणार नाही पण टीम इंडियाला हरवणे हे सोपे काम म्हणता येणार नाही. आजच्या सामन्यात मोहम्मद शमी जोरदार गोलंदाजी करत आहे, त्याला एक विक्रम करण्याची संधी आज आहे.
मोहम्मद शमी रचू शकतो विक्रम!
जर 34 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात 3 बळी घेण्यात यशस्वी ठरला, तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 'विकेट्सचे दुहेरी शतक' झळकावेल. मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय वनडे फॉरमॅटमध्ये 200 विकेट पूर्ण करेल. हा विक्रम असेल आणि त्याला ही संधी चालून आली आहे.
IND vs BAN सामना थेट कुठे पहायचा
दोन्ही संघांमधील सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होईल. यानंतर दुपारी अडीच वाजता सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. OTT सामना JioHotstar वर थेट येईल.
पिच आणि वेदर रिपोर्ट
दुबईची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. संध्याकाळी खेळपट्टी चांगली होते. दुपारी हवामान उष्ण असते परंतु संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्थिर होतील आणि प्रेक्षक मनोरंजनाची अपेक्षा करू शकतात.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद ऋषी, हर्षित, हर्षित, अरविंद, रविंद्र जडेजा शाभ पंत, वॉशिंग्टन सुंदर
बांगलादेश संघ - सौम्या सरकार, तनजीद हसन, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), झाकीर अली (रक्षक), मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, तनजीद हसन, मुस्फिकुर रहमान, तन्जीद हसन, मुशफिकर रहिम हृदय, रिशाद हुसेन, परवेझ हुसेन इमोन, नसम अहमद
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications