Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाऊस जिंकणार..? बांग्लादेशला व्हाईट वाँशची देण्याची भारतीय संघाची तयारी, हैदराबादमध्ये पावसाचे सावट

IND vs BAN 3rd T20 Pitch Report : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना आज शनिवारी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आधीच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 6 गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात 86 धावांनी पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. पावसामुळे तिसऱ्या सामन्याची मजा खराब होऊ शकते.

भारताची क्लिन स्वीपची तयारी

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. सलग दुसरी मालिका क्लीन स्वीप करण्याची भारतीय संघाची इच्छा आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी हैदराबादमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी ढगाळ वातावरण राहील. हवामानखात्यानुसार, सामन्यादरम्यान रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ind vs ban 3rd t20i match  pitch report

मैदानावर कालही होता पाऊस

काल शुक्रवारीही राजीव गांधी मैदानावर पाऊस होता. काल येथील मैदान पूर्णपणे झाकण्यात आले होते. आजही पावसाची पूर्ण शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना सामना बघायला मिळू शकतो, पण मध्येच पाऊस पडल्यानंतर प्रेक्षकांची निराशा होण्याचीही शक्यता आहे. याआधी बांग्लादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीदरम्यान पावसामुळे अडीच दिवस खेळ होऊ शकला नव्हता. मात्र अखेरच्या दोन दिवसांत भारताने शानदार कामगिरी करत सामना जिंकला होता. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन ड्यूश यांनी सांगितले की, मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघ सामन्यात नवीन चेहरे आजमावू इच्छितो. म्हणजेच हर्षित राणा आजच्या सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे.

भारताचे संभाव्य प्लेइंग 11:
सूर्यकुमार यादव,(कर्णधार) अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा

बांगलादेशचे संभाव्य प्लेइंग-11
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकिब.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+