IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी सामना कधी आणि कुठे पहायचा? सामना किती वाजता सुरू होईल?

IND vs AUS Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पाच सामन्यातील कसोटी मालिकेतील टीम इंडियाचा हा अंतिम सामना सिडनीमध्ये होणार आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाला विजयाची नोंद करावी लागणार आहे. या सामन्यातील पराभव म्हणजे WTC फायनलमधून बाहेर पडणे आहे.

ind vs aus

फोटो सौजन्य- पीटीआय

मेलबर्न कसोटी सामन्याच्या शेवटच्या सत्रात यजमान संघाने विजयाची नोंद केली होती. यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धा आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सामना कधी सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना 3 जानेवारी 2025 ला पहाटेच्या सुमारास सुरु होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरु होईल. त्याआधी पहाटे 4.30 वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी येतील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना कधी आणि कुठे पहायचा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना पहाटे 5 वाजता सुरू होणार असून तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहता येणार आहे. तसेच Hotstar ऍप्लिकेशन आणि वेबसाइटवर थेट सामना पाहता येईल.

सिडनी कसोटीत पावसाची काय स्थिती असेल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामन्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या खेळात तापमान खूप वाढण्याची शक्यता आहे. यानंतर, शेवटच्या दिवसाच्या खेळात पाऊस पडू शकतो पण त्याचा खेळावर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.

या सामन्याची खेळपट्टी कशी असेल?

सिडनीची खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या ओलाव्याचा फायदा घेऊ शकतात. फलंदाजांना टेक्निकवर लक्ष केंद्रित करावे लागेल, त्यानंतर धावा होतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+