भारताचा सिडनी कसोटीत पराभव; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 10 वर्षांनंतर गमावली, ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली
IND Vs AUS Sydney Test, Day 3 : सिडनी कसोटीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेटने पराभूत झाला आहे. या पराभवासह भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत 3-1 असा पराभव पत्करावा लागला आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर भारताचा पराभव केला आहे. यापूर्वी कांगारू संघाने 2014-15 च्या सीरीजमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडून मालिका जिंकली होती.

ऑस्ट्रेलिय संघाने दुसऱ्या डावातच टारगेट पूर्ण केले
रविवारी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 4 विकेट गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेड 34 आणि ब्यू वेबस्टर 39 धावांवर नाबाद राहिले.
या दोघांशिवाय उस्मान ख्वाजाने 41 आणि सॅम कॉन्स्टासने 22 धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णाने ३ बळी घेतले. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 157 धावांवर आटोपला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 181 धावांत सर्वबाद झाला होता, तर भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारताला पहिल्या डावात 40 धावांची आघाडी मिळाली होती.
भारत WTC अंतिम शर्यतीतून बाहेर
या पराभवानंतर, भारतीय संघ (50.00%) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर ऑस्ट्रेलियाने (63.73%) सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
सिडनी कसोटीसाठी दोन्ही संघ
भारत: जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
ऑस्ट्रेलियाने मालिका 3-1 अशी जिंकली
27 वे षटक टाकत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरच्या शेवटच्या चेंडूवर ब्यू वेबस्टरने चौकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कांगारू संघाने हा सामना 6 विकेटने जिंकला आहे. संघाने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली.












Click it and Unblock the Notifications