IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल,भारताविरुद्धच्या पिंक चेंडूच्या कसोटीत 1 दिवस आधी संघ घोषित
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी आपला संघ घोषित केला आहे. पिंक चेंडूच्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघातील बदलांबाबत माहिती दिली आहे.
जोश हेजलवूड दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. तो या सामन्यात खेळू शकणार नाही हा संघासाठी मोठा धक्का म्हणता येईल. त्याच्या जागी एका नव्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये इतर कोणताही बदल केलेला नाही.

हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघात इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर आहे. दुसरा सामना ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
बोलंड आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. याआधीही तो ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी क्रिकेट खेळला आहे. मात्र, गेल्या 18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली आहे. 10 कसोटी सामन्यात 35 बळी घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.
भारतीय संघ यापूर्वी ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक चेंडूचा कसोटी सामना खेळला आहे. त्यादरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली होती. अवघ्या 36 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता. मात्र, नंतर त्या दौऱ्यात भारताने मालिका जिंकली. यावेळी पिंक चेंडूची कसोटी 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पर्थ कसोटी जिंकून भारतीय संघाने आघाडी घेतल्याने मनोबल उंचावलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग 11 : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.












Click it and Unblock the Notifications