Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघात मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन, सामन्यापूर्वी प्लेइंग-11 जाहीर

India vs Australia 3rd Test playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून गाबा ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला प्लेइंग-11 जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मॅच विनर असलेला खेळाडू जोश हेजलवूडचे संघात पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकला नव्हता.

जोश हेझलवूडचे पुनरागमन जोश हेझलवूड त्याच्या अचूक लाइन आणि लेंथसाठी ओळखला जातो. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दिग्गज फलंदाजांना पहिल्या कसोटीत हेझलवूडच्या गोलंदाजीसमोर चाचपडले होते. हेजलवुडच्या पुनरागमनामुळे स्कॉट बोलंडला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. ॲडलेड डे-नाईट कसोटीत हेझलवूडच्या जागी बोलंडने संघात स्थान मिळवले होते, पण आता हेझलवूडच्या फिटनेसनंतर संघात हा एकमेव बदल करण्यात आला आहे.

australian team

या बदलाबाबत कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, बोलंडची कामगिरी काही काळापासून उत्कृष्ट राहिली आहे. मात्र त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत. कमिन्सने कबूल केले की, बोलंडला त्याच्या स्थितीत नेहमीच चांगली कामगिरी करूनही गेल्या 18 महिन्यांत मैदानाबाहेर वेळ घालवावा लागला आहे. पुढील कसोटी सामन्यांमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी बोलंडला आणखी एक संधी मिळेल, असा विश्वास कमिन्स व्यक्त केला आहे.

कमिन्स पुढे म्हणाला की, बोलंडला आगामी कसोटी सामन्यांसाठी तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण त्याचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट म्हणजे बोलंडने या मालिकेत आतापर्यंत किमान एक कसोटी खेळली आहे. त्यामुळे त्याला सामन्याचा सराव झाला आहे. तो पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी चांगली तयारी करू शकतो.

गाबा कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+