बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
Jasprit Bumrah ICC World Ranking : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी नवीन वर्ष एक नवीन भेट घेऊन आलं आहे. बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने क्रमवारीत असे काही केले आहे, जे यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडू करू शकला नाही. त्याने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
बुमराह हा कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. जागतिक क्रिकेटमधील अन्य कोणताही गोलंदाज त्याच्या जवळपासही नाही. तसेच त्याने रविचंद्रन अश्विनचा एक मोठा विक्रमही तोडला केला.

बुमराहने भारतासाठी सर्वाधिक रेटिंग गुणांचा विक्रम केला आहे. हा विक्रम ब्रिस्बेन कसोटीनंतर निवृत्त झालेल्या अश्विनच्या नावावर होता, मात्र आता बुमराहने अश्विनला मागे टाकलं आहे. अश्विनच्या नावावर 904 रेटिंग गुण होते.
आयसीसी क्रमवारीत बुमराहचे रेटिंग गुण
बुमराहचे आता 907 रेटिंग गुण आहेत. बुमराहनंतर ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूडचे नाव येते. रेटिंग गुणांच्या बाबतीत दोघांमध्ये खूप फरक आहे. हेजलवुडच्या नावावर केवळ 843 रेटिंग गुण आहेत. अशा प्रकारे बुमराहचा पूर्ण दबदबा दिसून आला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी
सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या केवळ चार सामन्यांत बुमराहने खळबळ उडवून दिली आहे. त्याने स्फोटक गोलंदाजी करत एकूण 30 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. बुमराहने इतर सर्व गोलंदाजांना मागे टाकून सातत्यपूर्ण ही कामगिरी केली आहे.
आयसीसी क्रमवारीत जयस्वालला फायदा
दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने कसोटी फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा एका स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वेळी जयस्वाल यांच्या मानांकनात घसरण झाली होती. आता तो पुन्हा चौथ्या स्थानावर आला आहे. इंग्लंडचा जो रूट पहिल्या तर हॅरी ब्रूक दुसऱ्या स्थानावर आहे. विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.












Click it and Unblock the Notifications