Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ICC Women ODI World Cup : महिला वन-डे विश्वचषक कुठे व कधी होणार, जाणून घ्या- तारीख आणि ठिकाण

ICC Women ODI World Cup 2025 venue and dates Details in marathi : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या वर्षीच्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा आणि ठिकाणाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

महिला वनडे विश्वचषकाचे सामने कुठे व कोणत्या तारखेला होतील, याची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर यात विशेष म्हणजे पाकिस्तानच्या महिला क्रिकेटर कुठे खेळणार याबाबत देखील निश्चित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला विश्वचषकाची स्पर्धा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. भारत आणि श्रीलंकेतील 5 ठिकाणी या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील.

तर भारतात व श्रीलंकेत विश्वचषकाचे सामने खालील दिलेल्या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

  • एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बेंगळुरू)
  • एसीए स्टेडियम (गुवाहाटी)
  • होळकर स्टेडियम (इंदूर)
  • एसीए-व्हीडीसीए स्टेडियम (विशाखापट्टणम)
  • आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो)

ICC Women ODI World Cup

कधीपासून सुरू होणार महिला विश्वचषक स्पर्धा?

आयसीसीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये भारताच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होईल, ज्याद्वारे महिला क्रिकेट विश्वचषक 12 वर्षांनंतर भारतात परतेल.

या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबो येथे खेळला जाईल, तर दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे होईल.

फायनल कधी व कुठे होणार?

रविवारी बेंगळुरू किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही संघांना जेतेपदाच्या लढतीसाठी किमान दोन दिवसांचा वेळ मिळेल.

महिला विश्वचषकात किती संघ सहभागी होणार

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत गतविजेता म्हणून प्रवेश करेल. त्यांनी २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये इंग्लंडला हरवून शेवटचा महिला विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेच्या इतिहासातील ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने सात वेळा विजेतेपद जिंकले आहे.

पाकिस्तानमुळे श्रीलंकेत होतील सामने

भारत, पाकिस्तान आणि आयसीसीने कोणत्याही जागतिक स्पर्धेसाठी हायब्रिड होस्टिंग मॉडेलवर सहमती दर्शविली होती. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, त्यानंतर दीर्घ वाटाघाटीनंतर हा करार झाला.

या करारानुसार, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबईला हलवण्यात आले. 2025 च्या महिला विश्वचषकासाठी भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि पाकिस्तान पात्र ठरले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+