Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Virat Kohli Fine: सॅम कॉन्स्टासशी वाद घालणं विराटला महागात पडलं, आयसीसीने केली मोठी कारवाई

Virat Kohli Fine: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला. मैदानावरील दोघांमधील या बाचाबाचीच्या गंभीर घटनेची दखल घेत आयसीसीनेही याबाबत निर्णय दिला आहे.

या वादानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर कारवाई करण्यात आली आहे. कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीला त्याच्या वर्तनासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यात त्याने मैदानावर सॅम कॉन्स्टासला जोराचा धक्का दिला होता. विराट कोहलीने आपली चूक मान्य केली असून त्याचे वर्तन खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे त्याने मान्य केलं आहे.

Virat Kohli

आयसीसीची विराटवर कारवाई

या वादानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर कारवाई करण्यात आली आहे. कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीला त्याच्या वर्तनासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. आज सामन्यात मैदानावर सॅम कॉन्स्टासला धक्का देण्यात आला होता. विराट कोहलीने आपली चूक मान्य केली असून त्याचे वर्तन खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे त्याने मान्य केलं आहे.

कॉन्स्टास आणि कोहली यांच्यात वाद

सामन्यादरम्यान कॉन्स्टास जेव्हा धाव घेण्यासाठी धावत होता, तेव्हा कोहली वेगाने चालत आला आणि त्याने कॉन्स्टासला धक्का दिला. यामुळे कॉन्स्टास संतापला आणि त्याने कोहलीला काहीतरी सांगितले. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली आणि परिस्थिती थोडी तणावपूर्ण झाली. पण काही वेळातच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि अंपायर तिथे पोहोचले आणि दोघांना बाजूला केलं. त्यामुळे परिस्थिती सामान्य झाली.

निलंबनाची कारवाई टळली

कोहलीने या वादासाठी आपली चूक मान्य केली. दरम्यान परिणामी त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे . यासोबतच कोहलीला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. ज्यामुळे त्याच्या आगामी सामन्यांमध्ये निलंबन होणार नाही. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूचे 3 किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण असतील तर त्याला निलंबनाला सामोरे जावे लागू शकते. ही कारवाई आयसीसीच्या शिस्तभंगाच्या नियमांतर्गत करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+