ICC ODI Rankings: भारताला 'रँकिंग'मध्ये धक्का! रोहित-कोहलीची नावे गायब, कोण आहे टॉपवर!
ICC ODI Rankings 2025, Rohit Sharma & Virat Kohli Missing : बुधवारी २० ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत (icc odi rankings ) एक मोठा आणि अनपेक्षित गोंधळ पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात फलंदाजांच्या टॉप-५ मध्ये स्थान असलेले भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांची नावे या क्रमवारीत अचानक गायब झाली. तर, युवा फलंदाज शुभमन गिलने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
गेल्या आठवड्यात, १३ ऑगस्ट रोजी, जाहीर झालेल्या क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होते. मात्र, २० ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या यादीतून दोघांचीही नावे गायब झाली. आयसीसीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली, तरी हा तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही आयसीसीच्या क्रमवारीत अशा चुका झाल्या आहेत, ज्या नंतर दुरुस्त करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी, आयसीसीने चुकून भारतीय संघाला कसोटीत नंबर-१ संघ म्हणून घोषित केले होते, आणि सुमारे अडीच तासांनंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली होती.

गिल आणि अय्यर टॉप-१० मध्ये
या गोंधळातही भारतीय क्रिकेटसाठी एक आनंदाची बातमी आहे. फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल ७८४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, पाकिस्तानचा बाबर आझम (७३९ गुण) दुसऱ्या क्रमांकावर आहे. गिलव्यतिरिक्त, भारताचा श्रेयस अय्यर (७०४ गुण) हा एकमेव फलंदाज आहे जो टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकला आहे.
बॅटर्स रॅकिंग
- शुभमन गिल -७८४
- बाबर आझम -७३९
- डॅरिल मिशेल- ७२०
- चरिथ अस्लंका - ७१९
- हॅरी टेक्टर - ७०८
- श्रेयस अय्यर - ७०४
- शाई होप - ६९९
- इब्राहिम इद्रान - ६७६
- कुसल मेंडिस - ६६९
- ट्रॅव्हिस हेड - ६४८
गोलंदाजांमध्ये केशव महाराज अव्वल, कुलदीप तिसऱ्या स्थानी
गोलंदाजांच्या क्रमवारीतही मोठे बदल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज (६८७ गुण) पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (६५० गुण) एका स्थानाने खाली येत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेचा महिष थीकशन (६७१ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे.
ICCच्या या तांत्रिक चुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे नाव पुन्हा टॉप-१० मध्ये कधी परत येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications