Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Auction 2025: आयपीएल संघांमध्ये आता ही किती स्लॉट शिल्लक ? कमी पैशात कोणते काम करता येईल?

IPL Auction 2025: IPL लिलावाच्या पहिल्या दिवशी मोठ्या खेळाडूंवर मोठी बोली लागली आणि धमाका पाहायला मिळाला. पैशांच्या पावसामुळे पहिल्या दिवशी अपेक्षेइतके खेळाडू विकले गेले नाहीत. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर आदी खेळाडू श्रीमंत झाले.

लिलावात एकूण 204 खेळाडू विकले जाणार आहेत परंतु लिलावाच्या पहिल्या दिवशी अर्धाही आकडा पूर्ण झाला नाही. एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली आणि त्यात कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचे मिश्रण होते. लिलावाचा आज दुसरा दिवस असून सर्व स्लॉट भरायचे आहेत. अनेक संघांकडे पैसे कमी आणि स्लॉट जास्त आहेत.

IPL Auction 2025

जर एकूण स्लॉट बद्दल बोलायचं झालं तर 132 खेळाडू खरेदी करायचे आहेत. वेगवेगळ्या सेटसाठी बोली सुरू होईल. कालप्रमाणे आजही काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पहिल्या सेटमध्ये उतरतील. काही खेळाडू काल न विकले गेले, आज त्यांच्यावरही बोली लागण्याची शक्यता आहे.

डेव्हिड वॉर्नर, देवदत्त पडिक्कलसारखे खेळाडूसाठी कोणाताही संघ खरेदी करण्याकरिता पुढे आला नाही. ते कदाचित मूळ किमतीवर खरेदी केले जाऊ शकतात. पहिल्या दिवशी पैसे वाचवण्यासाठी कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नाही. आता संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर उरलेले पैसे वापरता येतील पण अजून स्लॉट भरणे बाकी आहे.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्सकडे प्रत्येकी 16 खेळाडूंसाठी स्लॉट शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्सकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 14 स्लॉट शिल्लक आहेत. पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सकडे प्रत्येकी 13 खेळाडूंसाठी स्लॉट शिल्लक आहेत, दिल्ली, केकेआर आणि हैदराबादकडे प्रत्येकी 12 खेळाडूंसाठी स्लॉट शिल्लक आहेत.

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक ?

आरसीबीकडे अजूनही सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. पर्समध्ये 30 कोटींहून अधिक रक्कम आहे. मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये 26 कोटींहून अधिक रक्कम शिल्लक आहे. पंजाब किंग्सकडे 22 कोटींहून अधिक आहे. सनरायझर्स हैदराबाद संघात सर्वात कमी रक्कम आहे. त्यांच्याकडे 5 कोटी रुपये आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+