हेलिकॉप्टर शॉट धोनीने नव्हे तर या भारतीयाने पहिल्यांदा खेळला होता, सेहवागने केला मोठा खुलासा
IPL 2025 : सध्या आयपीएलचा 18 वा सीझन सुरु आहे. सगळीकडे आयपीएलची चर्चा आहे. आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजीने आपली छाप सोडत आहेत. त्यांच्या संघर्षाची चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे. जो दिवसेंदिवस बदलत जात आहे. रोहीत शर्माचा पूल शॉर्ट, विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह आणि महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉटने क्रिकेट चाहत्यांना नेहमीच आनंद दिला आहे.
क्रिकेट विश्वात 'हेलिकॉप्टर शॉट' हा असाच एक अनोखा आणि रोमांचक शॉट आहे, ज्याने क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले आहे. हा शॉट त्याच्या अनोख्या टेक्निक आणि स्टाईलसाठी ओळखला जातो, जिथे फलंदाज हेलिकॉप्टरच्या ब्लेडप्रमाणे बॅट फिरवतो. हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की सर्वात आधी धोनीचं नाव समोर येतं, पण प्रश्न असा आहे की हा शॉट आधी कोणी खेळला आहे?

हेलिकॉप्टर शॉटला लोकप्रिय करण्याचे श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले जातं. धोनीने या शॉटला आपली ओळख बनवली आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.त्याच्या खास टेक्निमुळे एकेकाळी यॉर्कर चेंडू केवळ रोखता येत नव्हता तर तो मैदानाबाहेरही धोनीने पाठवला आहे.
अनेक क्रिकेट तज्ञ आणि चाहत्याचं म्हणं आहे की, हेलिकॉप्टर शॉट हा धोनीच्या आधीपासून किक्रेट विश्वामध्ये खेळला गेलेला आहे. काही लोकांचा असा दावा आहे की, हा शॉट पहिल्यांदा सचिन तेंडुलकरने 2002 मध्ये खेळला होता. त्यावेळी सचिनने बॅट किंचित फिरवून शॉट खेळला होता, ज्याला हेलिकॉप्टर शॉटचा प्रारंभिक प्रकार म्हटलं जात आहे.
आयपीएल 2005 च्या चर्चा दरम्यान टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला. सेहवाग म्हणाला की हेलिकॉप्टर शॉट खेळणारा पहिला खेळाडू धोनी नव्हे तर मोहम्मद अझरुद्दीन हा पहिलाच शॉट खेळला होता. तसेच सेहवागने अप्पर कटबद्दल एक मोठा खुलासाही केला आहे. सेहवाग म्हणाला की, सचिन किंवा मी नाही तर विवियन रिचर्ड्सने हा शॉट आधी खेळला होता.
दरम्यान हे निश्चितच खरे आहे की, धोनीने हेलिकॉप्टर शॉटला त्याच्या स्टाईलनुसार जुळवून घेऊन एक क्रिकेट विश्वात नवीन ओळख करुन दिली. धोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये 2000 च्या दशकात आणि नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हेलिकॉप्टर वापर सुरू केला त्यावेळी हेलिकॉप्टर शॉट प्रथम प्रसिद्धीच्या झोतात आला. धोनीची खास टेक्निक आणि मनगटातील ताकदीमुळे आणि अचूक टायमिंगमुळे हेलिकॉप्टर शॉट प्रचंड लोकप्रिय झाला आहे. धोनीने या हेलिकॉप्टर शॉटच्या जोरावर अनेक टीम इंडियाला मोठे सामने ही जिंकून दिले आहेत. आज ही जगभरातील दिग्गज खेळाडू धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची कॉपी करताना आपल्याला दिसून येतात.












Click it and Unblock the Notifications