हरभजन सिंगला या चुकीची आजही लाज वाटते.. 200 वेळा मागितली माफी? प्रसंग सांगून भज्जी झाला भावूक
Harbhajan Singh slaps Sreesanth controversy : भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी फारच प्रसिद्ध आहे. त्याने भारतासाठी खास योगदान देऊन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात देशासाठी चांगला खेळ करुन नाव उंचावले आहे. हरभजनसिंग एकीकडे देशाची शान असला तरीही त्याला एक गोष्टीचं शल्य बोचतं आणि त्यासाठी त्याने एक दोन नव्हे तर तब्बल दोनशेवेळा माफी मागितली. ही गोष्ट खुद्द हरभजन सिंगनं भावूक होत भारताचा ऑफस्पीनर रविचंद्रन अश्वीनसोबत पाॅडकास्टमध्ये सांगितली. त्याने त्या प्रसंगाचा खुलासा तर केलाच पण ही कटू आठवणही त्याने जीवनातून हटवण्यासंदर्भात भावना व्यक्त केली.

आयपीएल श्रीसंत आणि हरभजनसिंग
आता तुम्ही म्हणाल की, असा कोणता प्रसंग होता पण होय आयपीएलमधील एका सामन्यावेळीचा तो प्रसंग आजही ज्याची चर्चा होते, जेव्हा मैदानावर गैरवर्तनाचा विषय येतो तेव्हा हरभजन आणि श्रीसंतचा किस्सा येतोच. हरभज जेव्हा मुंबई इंडियनकडून खेळत होता तेव्हा हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात लगावली होती, या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रीया क्रीडा जगतातून आल्या होत्या.
पाॅडकास्टमध्ये हरभन काय म्हणाला?
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजननं असेही म्हटले की, श्रीसंत आणि मी सोबत खेळलेला आहे. जरी आम्ही त्यावेळी आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत होतो तरीही मला मला त्या पातळीवर उतरायला नको होते. श्रीसंतची एकमेव चूक होती की, त्याने मला चिथावणी दिली पण मी जे केले ते अजिबात बरोबर नव्हते अशी कबुलीही त्याने दिली.
आयपीएलमध्ये जी घटना घडली ती घडायला नको होती
भज्जीने असे म्हटले आहे की श्री संत सोबत आयपीएल मध्ये जी घटना घडली ती घडायला नको होती श्री संत त्यावेळी पंजाब किंग सोबत तर हरभजन मुंबई इंडियन्स कडून खेळत होता भजी नाही म्हटल आहे की या प्रकरणात मी 200 वेळा माफी मागितली आहे श्री संत सोबत झालेला प्रकार मी आपल्या क्रिकेट करिअर मधून बाजूला सारू इच्छितो मी त्या चुकीसाठी मला आजही लाज वाटते.
श्रीसंतच्या मुलीची मागितली भज्जीने माफी
श्रीसंतच्या मुली सोबत जेव्हा भेट झाली तेव्हा या गोष्टी हे संबंधित भज्जीने खुलासा केला आहे. हरभजन सिंगनेम्हटले आहे की, मला खूप वर्षानंतर दुःख जाणवलं जेव्हा मी श्रीसंतच्या मुलीसोबत भेटलो आणि तिच्याशी चर्चा केली मी तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलत होतो, तेव्हा तिने मला म्हटलं की तुम्ही माझ्या बाबांना मारलं होतं म्हणून मी तुमच्याशी बोलणार नाही हे ऐकून माझं हृदय हळहळलं आणि मला रडूच कोसळणारं होतं, मी स्वतःला विचारलं की ती मला आता वाईट समजत आहे ही गोष्ट सांगताना हरभजन फारच भाऊ झाला होता.
श्रीसंतची मुलगी हरभजनला समजते वाईट माणूस
हरभजन म्हटलं की, श्रीसंतची मुलगी त्याला एक वाईट माणूस मानते. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती मला समजून घेईल असं हरभजननं आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं. मी त्याच्या मुलीचीही माफी मागतो आणि तिला असं म्हणतो की असं मी काय करू शकतो ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.












Click it and Unblock the Notifications