GT VS MI गुजरातचा स्वप्नभंग मुंबईच्या कोणत्या खेळाडूने केला? कोणत्या मोडवर टर्न झाला, मॅच जाणून घ्या
GT VS MI match Turning Point : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यातील सामना काल मुंबई इंडियन्सने 20 धावांनी जिंकला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात मुंबई एकवेळ हरते की काय अशी स्थिती गुजरातच्या साई सुदर्शनने करुन टाकली पण अखेर मुंबईचा हुकमी एक्का मदतीला धावून आला आणि त्यामुळे मुंबईने दुसऱ्या क्वालीफायदरमध्ये प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 5 विकेटवर 228 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने आज जोरदार खेळाचे प्रदर्शन घडवले. पहिल्या विकेटसाठी बेअरस्टोसोबत त्याची भागीदारीही खास होती. दोघांनी 84 धावा जोडल्या. रोहितने 50 चेंडूंचा सामना करत 81 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा शुभमन गिल (1) अवघ्या एका धावेचा पाहुणा ठरला. पायचित झाल्यानंतर तो तंबूत परतला. यानंतर मात्र साई सुदर्शन नावाच्या वादळाने मुंबईच्या गोलंदाजांवर कहर केला. त्याने शानदार फलंदाजी केली. त्याने प्रथम कुसल मेंडिससोबत अर्धशतकी भागीदारी केली. नंतर, त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबतही महत्त्वाची भागीदारी केली.
सुंदर आणि सुदर्शन एकत्र गुजरातला विजयाकडे घेऊन जात होते आणि धावगतीही खूप वेगवान होती. अशावेळी मुंबई पराभवाच्या छायेत होती. 13 षटकांच्या अखेरीस गुजरातचा स्कोअर 2 विकेटसह 148 इतका होता. ही जोडी खूपच घातक ठरत असतानाच मुंबई संघाचा प्रशिक्षक चमू चिंतेत होता. वॉशिंग्टन सुंदर किंवा सुदर्शन यांना बाद करण्याची गरज होती. यावेळी सामन्याला वळण लागले.
मुंबईच्या खेळाडूने काढले आपले अस्त्र बाहेर!
डावातील 14 वे षटक मुंबईसाठी सामना आपल्या बाजूने झुकवणारे ठरले. हे षटक बुमराहला देण्यात आले आणि त्याने त्याच्याकडून अपेक्षित असलेले काम केले. बुमराहने शानदार यॉर्कर टाकले आणि सुंदरला 48 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर क्लिन बोल्ड केले. बुमराहचा टाकलेला अफलातून चेंडू सुंदरला खेळताच आला नाही आणि दोन्ही पायातून चेंडू यष्टीवर आदळला अशा तऱ्हेने तो बाद झाला. विशेष म्हणजे बुमराहने गुजरातची धावगतीही कमी करुन टाकली.
आता संपूर्ण दबाव सुदर्शनवर होता आणि सामना मुंबईच्या दिशेने जाऊ लागला. बुमराहने त्याच्या षटकात एक विकेट घेतली आणि फक्त 4 धावा दिल्या. नंतर ग्लीसनने सुदर्शनला (80) बाद केले. सुदर्शन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात क्लिन बोल्ड झाला. यानंतर, 18 व्या षटकात पुन्हा एकदा बुमराहला आणण्यात आले. या दरम्यान, तेवतिया आणि रदरफोर्ड क्रीजवर होते. तेवतियाने षटकार मारला पण बुमराहने जोरदार पुनरागमन केले आणि या षटकात फक्त 9 धावा आल्या. यामुळे गुजरातवर दबाव वाढला. पुढच्याच षटकात बोल्टने रदरफोर्डला बाद केले.
गुजरात आउट येथून गुजरातसाठी गोष्टी कठीण झाल्या आणि आवश्यक धावगती साध्य करता आली नाही. अखेर गुजरात टायटन्स 6 विकेट्सवर 208 धावा करू शकले आणि मुंबईने ऐतिहासिक सामना जिंकला आणि गुजरातला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.












Click it and Unblock the Notifications