GT vs CSK:राशीद खानच्या नावावर लाजीरवाणा विक्रम; चेन्नईच्या फलंदाजांनी त्याला धो-धो धुतलं, काय घडलं
IPL 2025, GT vs CSK : आयपीएलच्या या हंगामात त्यांचा शेवटचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजीमध्ये आज ढासू कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना चेन्नईच्या फलंदाजांनी कमकुवत ठरवले. शेवटच्या षटकांमध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली. या हंगामातील एक लाजिरवाणा विक्रमही राशीद खानच्या नावावर नोदवला गेला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात ज्याच्या बॉलवर सर्वाधिक षटकार मारले गेले, अशा लाजीरवाण्या विक्रमाच्या यादीमध्ये राशीद खानने एंट्री केली आहे. या बाबतीत तो मोहम्मद सिराजसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आला आहे. या हंगामात राशीद खानने त्याच्या गोलंदाजीने खूप निराशजनक कामगिरी केली आहे.

त्याच्या गोलंदाजीत एकूण 31 षटकार मारले आहेत. सिराजच्या बॉलवर 2022 मध्येही तेवढेच षटकार मारले गेले होते. दुसऱ्या क्रमांकावर वानिंदू हसरंगा आहे, त्यालाही एकूण 30 षटकार मारून फलंदाजांनी धुतले आहे. या यादीत युजवेंद्र चहलचेही नाव आहे, त्याच्या नावावर 30 षटकारांचा मारा आहे ड्वेन ब्राव्होच्या नावावर 29 षटकार दिल्याचा रेकॉर्ड आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 5 बाद 230 धावांचा मोठा डोंगर उभा केला. डेवाल्ड ब्रेव्हिसने फक्त 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनवे या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी एकूण 44 धावांची भागीदारी केली.
जीटी विरुद्ध सीएसके: कॉनवेचा अर्धशतक
17 चेंडूत 34 धावा करून म्हात्रे बाद झाला पण डेव्हॉन कॉनवेने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या बॅटने 35 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. उर्विल पटेलनेही काही आकर्षक फटके खेळून धावगतीचा वेग कमी होऊ दिला नाही. त्याने 19 चेंडूंचा सामना करत 37 धावांची खेळी केली.
जीटी विरुद्ध सीएसके: ब्रेव्हिसचे वादळ
डेवाल्ड ब्रेव्हिसने 23 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून 5 षटकार आणि 4 चौकार आले. जडेजाची फलंदाजी मंद होती, तो 18 चेंडूत 21 धावा काढून नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली आणि 22 धावा देत 2 बळी घेतले.












Click it and Unblock the Notifications