Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'सर्व चुकीचं आहे,फक्त मीच बरोबर',कोहली-धोनीवर कमेंट करून अमित मिश्रा अडचणीत, यूजर्सने केले ट्रोल

क्रिकेटपटू अमित मिश्रा गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली, एमएस धोनी आणि माजी भारतीय खेळाडूबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. यावेळी, सोशल मिडीयावर यूजरला अमित मिश्राने सांगितलेल्या काही गोष्टी आवडल्या नाहीत आणि त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या विधानांवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

amit mishra

अनुभवी लेग स्पिनरने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्धच्या T20I मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला आहे. त्या सामन्यानंतर त्याला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गेल्या मोसमात तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसयला होता.

अमित मिश्राने अलीकडेच काही भारतीय खेळाडूंबद्दल कमेंट केल्यानंतर तो चर्चेत आला आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीत भारतीय संघातून मला वगळण्यात आलं. या बद्दल स्पष्टीकरण मिळालं नसल्याचे त्याने म्हटलं आहे.आयपीएलदरम्यान कोहली-नवीन-उल-हक-गौतम गंभीर वाद आणि नवीन खेळाड अशा विविध विषयांवरही त्याने आपले मत मांडले. अमित मिश्राने न्यूज अँकर शुभंकर मिश्रा यांच्याशी त्याच्या यूट्यूब शो 'अनप्लग्ड' वर बोलत होता.

दरम्यान अमित मिश्राने विराट कोहलीसोबतचे त्यांचे नाते कालांतराने कसे बदलले हे उघड केले. तो म्हणाला की, कर्णधारपदानंतर विराट कोहली आता पूर्वीसारखा राहिला नाही. रोहित शर्माच्या बाबतीत असे नाही, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इतके यश मिळवल्यानंतरही तसाच राहिला आहे. विराट कोहलीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल अमित मिश्रा म्हणाला, 'एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण आता त्याच्यासोबत पूर्वीसारखे नाते राहिले नाही.'

'मी खोटे बोलणार नाही. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण आता माझे त्याच्याशी पूर्वीसारखे नाते राहिलेले नाही. विराटला कमी मित्र का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव वेगळा आहे. मी तुम्हाला रोहितबद्दल सर्वात चांगली गोष्ट सांगतो. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा आणि आज जेव्हा भेटतोय तेव्हाही तो तसाच आहे. तो पुढे म्हणाला की, 'मी विराटला खूप बदलताना पाहिले आहे. आमचे बोलणे जवळपास बंद झाले. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आणि सत्ता मिळते तेव्हा त्याला असे वाटते की ,लोक काही कारणासाठी त्याच्याकडे येत आहेत, परंतु माझ्या ओळखीचा चिकू आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात खूप फरक आहे. जेव्हाही तो मला भेटतो तेव्हा तो माझ्याशी खूप आदराने वागतो, पण साहजिकच आता पूर्वीसारखे राहिले नाही.

अमित मिश्रा इथेच थांबला नाही तर त्याने मुलाखतीत केएल राहुल, शुभमन गिल यांच्या आयपीएल कामगिरीवर आणि त्यांच्या कर्णधारपदावरही टीका केली. त्याने गिलच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. अमित मिश्राच्या वक्तव्यानंतर युजर्स सक्रिय झाले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार मीम्स शेअर करून त्यांचे मत व्यक्त केले. येथे काही मजेदार मीम्स पहा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+