Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPLमधील या खेळाडूचा पाय खोलात; बलात्काराचा आरोप, पोलिस कधीही करू शकतात अटक, वाचा संपूर्ण वाद!

Former IPL cricketer Shivalik Sharma : मुंबई इंडियन्सचा माजी आयपीएल क्रिकेटपटू शिवलिक शर्माचा पाय खोलात गेला आहे. बलात्काराच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोधपूरमधील कुडी भगतसुनी पोलिस ठाण्यात खेळाडूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवलिक शर्मावर एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष देऊन सदर खेळाडूने पीडितेवर वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडितीने पोलिस ठाण्यात केली आहे. जोधपूरच्या पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि न्यायालयात तिचे म्हणणे यासह इतर औपचारिकता पूर्ण झाल्या. त्यानंतर आता पोलिस क्रिकेटपटू शिवलीक शर्माच्या अटकेसाठी तयार आहेत. ते कोणत्याही क्षणी त्यास अटक करू शकतात.

Former IPL cricketer Shivalik Sharma

पोलिस काय म्हणाले..!

जोधपूर आयुक्तालयाचे एसीपी आनंद सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कुडी भगतसुनी येथील सेक्टर 2 येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने आयपीएल क्रिकेटर शिवालिक शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अहवालात, मुलीने सांगितले की ती फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे भेट देण्यासाठी गेली होती, तेव्हा ती शिवालिकच्या संपर्कात आली. दोघेही मित्र बनले. अन् त्यानंतर लग्नाचे आमिष देत क्रिकेटपटूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलेला आहे.

पीडितेने काय केले आरोप

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात नोंद करण्यात आल्याप्रमाणे, सदर पीडिता आणि क्रिकेटपटू शिवालीक शर्मा यांचा फोनवरुन संपर्क झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. यानंतर दोघांचेही पालक एकमेकांना भेटले. शिवालिकचे पालक ऑगस्ट 2023 मध्ये जोधपूरला आले. त्यानंतर दोघांच्या संमतीने साखरपुडा झाला. मुलीच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर शिवालिक जोधपूरला परत आला तेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. दोघांनीही राजस्थानातील अनेक ठिकाणी भेट दिली.

ऑगस्ट 2024 मध्ये, जेव्हा पीडितेला वडोदरा येथे बोलावण्यात आले तेव्हा शिवालिकच्या पालकांनी तिला सांगितले की तो एक क्रिकेटपटू आहे. अशा परिस्थितीत, हे संबंध पुढे चालू राहू शकत नाहीत. त्याचे संबंध इतर ठिकाणांहून येत आहेत. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. वडोदराचा रहिवासी असलेला शिवालिक शर्मा 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो रणजी ट्रॉफीमध्ये वडोदराकडूनही खेळलेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+