टीम इंडियाच्या माजी खेळाडूच्या मुलाने केला लिंगबद्दल,म्हणाला-मी क्रिकेटसाठी खूप त्याग केले पण
Sanjay Bangar son video viral: भारतीय संघाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर याने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आर्यन बांगरने मुलगा ते मुलगी असा त्याचा प्रवास शेअर केला आहे. ही बातमी समोर आल्यापासून आर्यन बांगर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आर्यन बांगरची आता अनाया बांगर म्हणून नवीन ओळख तयार झाली आहे.

आर्यन ते अनया प्रवास
दरम्यान आर्यन बांगरवर 10 महिन्यांपूर्वी हार्मोनल रिप्लेसमेंट सर्जरी झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याने आपल्या ओळखीबाबत नवा मार्ग स्वीकारला असून आता त्याला स्वत:ला ट्रान्सपर्सन म्हणून लोकांसमोर येयचं आहे. अनायाने इन्स्टाग्रामवर तिच्या परिवर्तनाचा एक रील देखील शेअर केला आहे, ज्यामुळे तिचा प्रवास अधिकच चर्चेत आला आहे.
इंस्टाग्रामवर शेयर केली भावनिक पोस्ट
इंस्टाग्रामवर अनया एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा माझा प्रवास त्याग, समर्पण आणि आनंदाने भरलेला आहे. पहाटे मैदानात उतरण्यापासून ते इतरांच्या टीकेला सामोरे जाण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर खंबीर राहण्याची गरज होती. पण खेळाशिवाय माझा आणखी एक प्रवास होता, तो म्हणजे स्वत:ला ओळखण्याचा प्रवास. या मार्गात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
माझी खरी ओळख समजून घेण्यासाठी कठीण निर्णय घ्यावे लागले. 'फिटिंग इन' करण्याचा सोपा मार्ग बाजूला ठेवून हा प्रवास सोपा नव्हता. पण खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखणारा होता. अनाया सध्या मँचेस्टरमध्ये राहून एका क्लबसाठी क्रिकेट खेळते. तुम्हाला सांगतो की विराट कोहली आणि एमएस धोनी सारख्या क्रिकेट आयकॉनसोबत आर्यनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.












Click it and Unblock the Notifications