Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गळा दाबला, नशापान, चोरी! 14 शतकं ठोकणाऱ्या आस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटरला 4 वर्षांची जेल!

Former Australian cricketer Michael Slater sentenced to four years : कधी कधी म्हणतात ना..तुमच्याकडे सर्व काही असले तरीही तुम्ही चांगले असायला हवे...नव्वदीचा काळ तो.. आस्ट्रेलियासारख्या जगविख्यात टीमचा दिग्गज फलंदाज मार्क टेलरसोबत सलामीला यायचा आणि गोलंदाजांना सळो की, पळो करुन सोडायचा पण म्हणतात ना...की, वेळ आली की, सर्व काही गळुन पडते तसेच या खेळाडूचे झाले..या खेळाडूचे नाव आहे मायकल स्लेटर..

होय..मायकल स्लेटर कधीकाळी धमाकेदार फलंदाज म्हणून ज्याची गणना होत होती त्याला आता चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. घरगुती हिंसाचाराचा आरोप त्याच्यावर होता.

Michael Slater

(Photo - ICC)

मायकल स्लेटर याला जरी त्याला शिक्षा झाली असली तरीही तो एकेकाळी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीला एप्रिल 2024 पासून कोठडीत ठेवलेल्या वेळेमुळे सोडण्यात येणार आहे.

मायकलवर काय होते आरोप?

मायकल स्लेटरवर महिलेचा गळा दाबणे, हल्ला करणे, पाठलाग करणे आणि चोरी या प्रकरणात त्याच्यावर आरोप आहेत. त्याच्यावरील सात आरोप मान्य झाल्यानंतर मंगळवारी मारूचीडोर जिल्हा न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली.

मद्यपान करुन चालवले होते वाहन!

मायकल स्लेटर याच्यावर मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याचा आरोप होता. यात त्याला मारूचीडोर मॅजिस्ट्रेट न्यायालयात स्वतंत्रपणे दोषी ठरवण्यात आले होते.

..म्हणून तुरुंगात राहणार नाही मायकल

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जामीन नाकारल्यानंतर, स्लेटरने 12 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. त्या न्यायालयीन हजेरीदरम्यान, त्याची जामीन विनंती फेटाळण्यात आली होती मात्र, शिक्षा झालेली वेळ आता ग्राह्य धरण्यात आली आहे आणि त्याच्या उर्वरित शिक्षेला पाच वर्षांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्या कालावधीत त्याने पुन्हा गुन्हा केला तर त्याला त्वरित पुन्हा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. या खटल्याचे न्यायाधीश ग्लेन कॅश यांनी स्लेटरच्या मादक द्रव्यांच्या गैरवापराबद्दल भाष्य करत "हे उघड आहे की तुम्ही मद्यपी आहात," असे नमूद केले, अशा परिस्थितीत पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण आव्हान स्लेटरने मान्य केले आहे.

कशी होती मायकलची कारकीर्द?

  • 1993 ते 2001 दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटर स्लेटरची कारकिर्द होती.
  • ऑस्ट्रेलियासाठी तो 74 कसोटी सामने खेळला आणि 14 शतकांसह 5 हजारांहून अधिक धावा केल्या.
  • सलामीवीर म्हणून तो फलंदाजीला यायचा. आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी तो ओळखला जात होता.
  • जागतिक क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाच्या काळात तो नियमित खेळत होता.
  • 2004 मध्ये व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, स्लेटरने ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात प्रवेश केला, यूकेच्या चॅनल 4 आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या सेव्हन नेटवर्कसह काम केले.
  • मायकल स्लेटरचा सेव्हन नेटवर्कसोबतचा करार वाढत्या वैयक्तिक समस्यांमुळे संपुष्टात आला. त्याची ही मीडिया कारकीर्द 2021 मध्ये थांबली.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+