Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ज्या वयात विक्रम रचायचे त्यावेळी थांबला;अवघ्या 27व्या वर्षी 'या' क्रिकेटरला का घ्यावी लागली निवृत्ती

Australia Test opener Will Pucovski has retired: ज्या वयात खेळाडू क्रिकेटमध्ये नवीन विक्रम रचतात त्या वयात जर एखाद्या खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागली तर ते एक मोठे दुर्दैव मानले जाते. असाच काहीसा प्रकार एका ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत घडला आहे.

27 वर्षीय फलंदाज विल पुकोव्स्कीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे, विशेषतः डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Will Pucovski

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्चमध्ये शेफील्ड शील्डमध्ये तस्मानियाविरुद्धच्या सामन्यात बाउन्सरने हेल्मेटला मारल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिकट झाली आणि तो अजूनही "भयानक" लक्षणांनी ग्रस्त आहे हे पुकोव्स्कीने एका मुलाखतीत मान्य केले.

कशी राहिली त्याची क्रिकेट कारकीर्द

पुकोव्स्कीने 2021 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीत पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात 10 धावा आणि दुसऱ्या डावात 62 धावा केल्या. यानंतर, सततच्या दुखापतींमुळे त्याची कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही.

त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत, त्याने 36 सामन्यांमध्ये 51.40 च्या सरासरीने 2,350 धावा केल्या. 2024 मध्ये, त्याने न्यू साउथ वेल्सविरुद्ध नॅथन लायन आणि इतर आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध शानदार शतक (131) झळकावले.

तो म्हणाला, "त्या शतकानंतर, मला वाटले की सर्वकाही पुन्हा रुळावर येत आहे. माझे स्वप्न ऑस्ट्रेलियासाठी 100 कसोटी खेळण्याचे होते, फलंदाजी क्रमवारीचा नेता बनण्याचे होते. पण दुर्दैवाने, माझा प्रवास फक्त एका कसोटीपुरता मर्यादित होता."

विल पुकोव्स्की पुन्हा क्रिकेट खेळणार नाही

तो म्हणाला, "मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही. हे वर्ष खूप कठीण गेले आहे. मागच्या दुखापतीनंतर, घरात फिरणे देखील कठीण झाले. मी बहुतेक वेळ झोपायचो आणि घरातील कामातही मदत करू शकत नव्हतो. माझी पत्नी देखील रागावायची. तो म्हणाला की लक्षणे अजूनही कायम आहेत आणि म्हणूनच त्याने खेळाला निरोप देण्याचा निर्णय घेतला.

आता समालोचन अन् प्रशिक्षण देणार

विल पुकोव्स्की याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी उत्तरे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, माझ्या मेंदूला काय नुकसान झाले आहे आणि हे सर्व का घडले हे समजून घेण्यासाठी. पण आता हे स्पष्ट झाले आहे की, परिस्थिती बदलत नाहीये. आता मला माझे आयुष्य सामान्य पद्धतीने जगायचे आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय समितीच्या शिफारशीनंतर त्याने स्वतःला मैदानापासून दूर केले होते. आता तो कोचिंगमध्ये पाऊल ठेवला आहे आणि व्हिक्टोरियन प्रीमियर संघ 'मेलबर्न'चा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. तो चॅनल सेव्हनवर समालोचन करतानाही दिसणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+