Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये मारामारी, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

आफ्रिकन देश गिनी येथे फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या मारामारीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत खुलासा केला आहे. एका डॉक्टरने एएफपीला सांगितले की, "रुग्णालयात बघाल तिथपर्यंत मृतदेह रांगेत पडलेले आहेत." शवगृह भरले आहे. सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही. व्हिडिओमध्ये सामन्याच्या बाहेरील रस्त्यावर गोंधळाचे वातावरण दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची धावपळ दिसून येत आहे. तर अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले आहेत.

Football Clash

गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर एन'जारेकोर येथे रविवारी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. सामन्याच्या मध्यभागी रेफ्रींनी घेतलेल्या निर्णयामुळे वादाची ठिणगी पडली. त्यावेळी एका संघाचे चाहते या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मैदानात पोहोचले. हे पाहून इतर संघाचे चाहतेही पुढे आले आणि यावरून दोन गटात हाणामारी झाली.

एकीकडे मैदानावर गोंधळ उडाला, तर दुसरीकडे हजारो चाहते रस्त्यावर उतरले आणि एकमेकांवर हल्ला चढवला. काहींनी पोलिस ठाण्याला आग लावली. या हिंसक चकमकींमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. सर्वत्र मृतदेह विखुरले गेले आहेत. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+