Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केसंच 300 ग्रॅमचे असतात कापलेही असते.! विनेश फोगटच्या सासऱ्यांचे वक्तव्य, म्हणाले - सुनेविरुद्ध कट

पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यासाठी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र घोषित केल्यानंतर, तिचा आणि देशाचा सुवर्ण जिंकण्याचा स्वप्नभंग झाला आहे. या घडामोडीनंतर सर्वस्थरातून प्रतिक्रीया येत आहे. ऑलिम्पिमधील या निर्णयानंतर तिचे सासरे राजपाल राठी यांनी षडयंत्र असल्याची भीती व्यक्त केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे वजन जास्त झाल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अवघ्या 100 ग्रॅम वजनाने तियाला अपात्र ठरवण्यात आले.

Father-in-law Rajpal Rathi s reaction to Vinesh Phogat s disqualification from Paris Olympics

काय म्हणाले विनेशचे सासरे?

विनेशचे सासरे राजपाल राठी म्हणाले, "केस 300 ग्रॅम वजनाचे असतात. एवढेच असते तर केस कापून टाकता आले असते" विनेश फोगटचे लग्न कुस्तीपटू सोमवीर राठीसोबत झाले आहे. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत 1 आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली होते. विनेश फोगटच्या सासऱ्यांनी आज तकशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

हृदय हळहळलं, डोळ्यात पाणी

हरियाणाच्या चरखी-दादरी येथे राहणाऱ्या विनेशचे सोनिपत येथे सासरचे घर आहे. विनेशच्या ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर सासरे राजपाल राठी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विनेशबद्दलची बातमी ऐकून त्यांचे हृदय हळहळलं आणि डोळ्यात पाणी आले. सासरच्यांनी सांगितले की, या बातमीने ते इतके दु:खी झाले आहेत की ते कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. विशेष म्हणजे मंगळवारी विनेशच्या विजयानिमित्त घरोघरी मिठाई वाटण्यात आली.

विनेशसोबत राजकारण : सासरे

विनेशसोबत राजकारण केले जात असल्याचे सासरे म्हणाले. तिचा पराभव कसा करायचा हे शोधण्यासाठी काही लोक सुरुवातीपासूनच त्याच्या मागे लागले आहेत. काही लोक विनेशला मॅटवर हरवू शकत नसतील तर राजकारण करून तिला हरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सासरे म्हणाले. 100 ग्रॅम जास्त वजन असेल तर 10 मिनिटांचा वेळ द्यायला हवा होता, पण हे षड्यंत्र रचून केले जात आहे. या क्षणासाठी मुलीने आयुष्यभर कष्ट केले आणि तिला एका षड्यंत्राद्वारे बाहेर फेकले जात आहे.

मंगळवारचा आनंद बुधवारी दु:खात

मंगळवारी तिच्या विजयाने विनेशच्या सासऱ्यांना खूप आनंद झाला आणि ती सुवर्णपदक जिंकेल अशी आशा बाळगून होते. खरखोडा येथील विनेशच्या सासरच्या घरीही सेलिब्रेशन पाहायला मिळाले.

देश आणि राज्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे विनेश अशी कामगिरी करत असल्याचे सासरे राजपाल राठी यांनी सांगितले होते. विनेशच्या सासूनेही मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, विनेशच्या विजयावर मी खूप आनंदी आहे असे म्हटले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+