IPL 2025: मुंबई इंडियन्सला धक्क्यामागून धक्के सुरुच; आता 'या' नव्या खेळाडूची झाली एन्ट्री
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स पाच वेळा विजेते ठरले आहेत. मात्र यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच, मुंबई संघाला धक्क्यामागून धक्के बसताना दिसत आहेत. एकीकडे संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत शंका असताना, आता वेगवान गोलंदाज अल्लाह गझनफरही आयपीएलमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या बाहेर जावे लागले आहे.

पाच कोटींचा खेळाडूला दुखापत
अफगानिस्तानचा स्टार खेळाडून अल्लाह गझनफर याला मुंबई इंडियन्सने ४.८० लाखांना विकत घेतले होते. मात्र तो आता दुखापतीमुळे संघात खेळू शकणार नाही. अल्लाह गझनफरने अवघ्या १८ व्या वर्षी अफगानिस्तानच्या संघात जागा मिळवली होती. त्याने आत्तापर्यंत अफगानिस्तानसाठी खोऱ्याने विकेट ओढल्या आहेत. मात्र आता तो दुखापतीमुळे आयपीएलच्य बाहेर झाला आहे. हा मुंबई संघासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
मुंबईत मुजीबची एन्ट्री
दुखापतीमुळे अल्लाह गझनफर बाहेप पडल्यानंतर मुंबईने अफगानिस्तानचा जादूई ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान याला करारबद्ध केले आहे. मुजीब त्याच्या देशाचा फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफरची जागा घेईल. अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय फिरकी गोलंदाजाच्या L4 कशेरुकाला फ्रॅक्चर झाले आहे आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. अफगाणिस्तानच्या अलिकडच्या झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान गझनफरला दुखापत झाली होती.
मुजीबनेही दाखवलीय जादू
मुजीब हा अफगानिस्तानचे प्रतिनिधीत्व करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने १७ व्या वर्षात आयपीएलमध्ये स्थान मिळवले आहे. मुजीबने अफगानिस्तानसाठी ३०० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळले असून, त्याने ६.५ च्या सरासरीने ३३० बळी घेतले आहेत. अफगानिस्तानचा हुकमी गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मुंबई इंडियन्सने मेगा आयपीएल लिलावात १८ वर्षीय उदयोन्मुख ऑफ स्पिनर गझनफरला ४.८० कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.












Click it and Unblock the Notifications