ED summons former cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन ईडीच्या रडारवर! मनी लाँड्रिंग केस
ED summons former cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. ईडीने माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी आज म्हणजेच गुरुवारी बोलावण्यात आले आहे.
क्रिकेटर मोहम्मद अझरोद्दीन यांच्यावर आधीच सामना निकाल निश्चितीसंदर्भात आधी आरोप झाले होते. यामुळे अनेक खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली होती हे प्रकरण आधी खूपच गाजले होते. 20 वर्षांपूर्वी भारतातही फिक्सिंगचा भूकंप झाला होता. यावेळी क्रिकेट मंडळातील भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते.

अझरुद्दीन आले होते मॅच फिक्सिंगमध्ये चर्चेत
आता यावेळी पुन्हा मोहम्मद अझरुद्दीन चर्चेत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय कर्णधार अझरोद्दीन यांना समन्स बजावले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना हे समन्स बजावले आहे. निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप
मोहम्मद अझरोद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तपास यंत्रणेने त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे.स्टेडियममध्ये सामना खरेदीसाठी जारी केलेल्या पैशांसदर्भात ही बाब आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि छत्र्यांच्या खरेदीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच हेराफेरीच्या बाबी समोर आल्या आहेत.
आजच इडीने बोलावले
अंमलबजावणी संचालनालयानेही अझरुद्दीनला समन्स पाठवले असून, या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तपासात सहकार्य करण्यासाठी अझहरला आजच येण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते हे पाहणे बाकी आहे. अझरुद्दीनचे नाव दोन दशकांपूर्वी एका मोठ्या मॅच फिक्सिंग प्रकरणात समोर आले होते, त्याच्यावर बीसीसीआयने बंदीही घातली होती. नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली हे विशेष.
20 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप
हे प्रकरण हैदराबादमधील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत खरेदी करण्यासाठी 20 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराभोवतीचे आहे. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी ऑक्टोबर 2023 मध्ये चार फौजदारी खटले दाखल केले होते त्यातून ही माहिती समोर आली आहे. यात अझरुद्दीन आणि माजी हैदराबाद क्रिकेट असोसीएशनच्या अधिकाऱ्यांवर विश्वासभंग, फसवणूक, खोटारडे आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निधीतील गैरव्यवस्थापन उघड
हैदराबाद क्रिकेट असोसीएशनने विनंती केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये मार्च 2020 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत निधीचे गैरव्यवस्थापन आणि खाजगी संस्थांकडे वळवल्याचे आढळून आले. ऑडिटच्या निष्कर्षांनंतर, हैदराबाद क्रिकेट असोसीएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते बोस यांनी अझरुद्दीन आणि इतरांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली.












Click it and Unblock the Notifications