दुहेरी विजेता नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात..! पत्नी कोण, हे स्वतः पोस्ट करत सांगितले
भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. समाजमाध्यमावर लग्नाचे फोटो अपलोड करून त्याने स्वतः आपल्या लग्नाची माहिती त्याच्या समस्त चाहत्यांना दिली आहे.

पत्नीचे नावही सांगितले
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लग्न केल्याची माहिती त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा होती. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. त्याच्या या लग्नसोहळ्यात त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंबिय उपस्थित होते. त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत लग्नाची गोड बातमी दिली.
जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की। 🙏
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 19, 2025
Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after.
नीरज ♥️ हिमानी pic.twitter.com/OU9RM5w2o8
स्वतः दिली माहिती
सोशल मीडियावर तो म्हणाला, आयुष्याच्या नव्या आध्यायाची सुरुवात कुटुंबासमवेत केली. त्या क्षणी आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशिर्वादाबद्दल कृतज्ञ आहे. हे नाते प्रेमाने बांधलेले, आनंदाचे निरंतर असेल.












Click it and Unblock the Notifications