विराट कोहलीच्या पाण्याच्या बाटलीची किंमत किती ? किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का, घ्या जाणून

Virat Kohli Water Bottle Price: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने फिटनेसमध्ये नवीन मानके प्रस्थापित केली आहेत. विराट कोहलीने आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी मांसाहारी जेवण सोडलं आहे. विराट मसालेदार किंवा तेलकट अन्नही खात नाही. अनेक वर्षांपूर्वी त्याने त्याच्या आहाराबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.

तंदुरुस्तीसाठी कडक नियम पाळणाऱ्या कोहलीच्या आहारात पाण्याचाही समावेश आहे. पिण्याच्या पाण्याची किंमत ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. कोहली व्यतिरिक्त त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील फिटनेसबद्दल जागरूक आहे.

Virat Kohli Water Bottle Price

कोहली जो पाणी पितो ते आरोग्यासाठी चांगले आहेच, पण तेवढेच महाग ही आहे. विराट एव्हियन नैसर्गिक झऱ्याचे पाणी पितो. एव्हियन स्प्रिंगचे नैसर्गिक पाणी हे सर्वात शुद्ध पिण्याचे पाणी मानले जाते. हे पाणी युरोपमधून येते. हे पाणी युरोपमधील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक असलेल्या एव्हियन पेस बेन्समधून येते. कोहली या पाण्याचे नेहमीत सेवन करतो.

विराट कोहलीसाठी हे पाणी फ्रान्समधून आयात केलं जातं. एक लिटर पाण्याची किंमत 4000 रुपये सांगण्यात आली आहे. यावरून विराट कोहली त्याच्या आरोग्याबद्दल किती जागरूक आहे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे हे दिसून येते.

विराट कोहली किती पाणी पितो ?

जर विराट कोहली दिवसाला तीन लिटर पाणी पितो तर त्याची किंमत 12 हजार रुपये होईल. एका महिन्यासाठी ही किंमत 3 लाख 60 हजार रुपये होते. जर विराट वर्षभर दररोज तीन लिटर पाणी पितो तर त्याची किंमत 43 लाख रुपयांपेक्षा जास्त होते.

विराट कोहली काय खातो?

विराटच्या आहाराबद्दल बोलायचे झाले तर तो बहुतेकदा उकडलेले अन्न खातो. त्याने अनेक वर्षांपासून तळलेले आणि भाजलेले अन्न खाल्ले नाही. तो अंकुरलेल्या आणि उकडलेल्या अन्नात मीठ मिसळून ते खातो. विराट कोहलीलाही चवीचा काही फरक पडत नाही.

विराट कोहलीची पुढची कामगिरी

कोहलीचे पुढील असाइनमेंट ही दिल्लीत होणारा रणजी ट्रॉफी सामना आहे. तो त्याच्या सराव सत्राला उपस्थित होता. कोहली हा सामना रेल्वेविरुद्ध खेळेल. 13 वर्षांनंतर तो या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात तो आपली छाप पाडू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+