दीप्ती शर्माने इतिहास रचला, असा चमत्कार करणारी पहिली भारतीय महिला ठरली
Deepti Sharma creates history: भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे. तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या कॅरेबियन संघाला 38.5 षटकांत केवळ 162 धावांवरचं रोखता आलं.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीप्तीने तीनवेळा 5 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीसह ती वनडेमध्ये तीन वेळा 5 विकेट घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
दीप्ती शर्माने 6 विकेट घेतल्या
दीप्तीने आपल्या शानदार गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूने वळवला. दीप्ती शर्माने आपल्या गोलंदाजीसह वेस्ट इंडिजविरुद्ध 10 षटकांत 3.10 च्या इकॉनॉमी रेटने 31 धावा देत 6 बळी घेतले. दीप्तीने वेस्ट इंडिजचे प्रमुख फलंदाज शमायन कॅम्पबेल, चिनेल हेन्री, जाडा जेम्स, आलिया ॲलेने, अफी फ्लेचर आणि अश्मिनी मुनिसार यांना बाद केले.
दीप्ती शर्माने रचला इतिहास
दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजचा डाव केवळ 162 धावांवर आटोपला. दीप्तीने 10 षटकात केवळ 31 धावा देऊन 6 बळी टिपले. जी तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीप्तीने तीनवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच बळी घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम झुलन गोस्वामी, नीतू डेव्हिड आणि एकता बिश्त यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी दोनदा हा पराक्रम केला होता. दीप्तीने केवळ 98 एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
रेणुका सिंह ठाकूरने ही दाखवली आपली ताकद
याशिवाय वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने 9.5 षटकात 29 धावा देत 4 बळी घेतले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दोन्ही गोलंदाजांनी मिळून महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 38.5 षटकात अवघ्या 162 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा 61 धावांची खेळी चिनेल हेन्रीने केली. त्याच्याशिवाय इतर फलंदाज फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. वेस्ट इंडिजचा संघ लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला.












Click it and Unblock the Notifications