विजेतेपदानंतर चक्क रडलेल्या गुकेशचा 'हा' व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का..? जिंकल्यानंतर झाला होता भावुक

बुद्धीबळाचा बादशहा ठरलेल्या डी गुकेशला भारतानेच काय पण आख्ख्या जगानं डोक्यावर घेतलंय. अगदी १८ व्या वर्षांत त्यानं ही कामगिरी करुन दाखवली. चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनला पराभूत करणं सोप्प नव्हतं. मात्र गुकेशने त्याच्यावर अगदी लिलया मात केली. विजयानंतर गुकेश भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

D Gukesh

शालेय जिवनापासून केली सुरुवात

विश्वविजेचा विश्वनाथन आनंद ज्या शाळेतून शिकला, त्याच शाळेचा डी गुकेश हा विद्यार्थी आहे. ग्रँडमास्टर प्रज्ञानंदही त्याच शाळेतला. प्रज्ञानंदला पाहून गुकेशने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. बुद्धीबळासाठीच गुकेशने चौथीनंतर नियमित शाळेत जाणे बंद केले, असेही काही मीडीया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. गुकेशमधील ग्रॅडमास्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनीही सर्वस्व पणाला लावलं. गुकेशने २०१५ मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्याने २०१८ मध्ये १२ वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. २०१८ च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ५ सुवर्णपदकं जिंकली. फ्रान्समधील ३४वी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर मार्च २०१८ मध्ये गुकेश आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. २०१९ पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश भावूक झाला.

आई-वडिलांचे सहकार्य

गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिल रजनीकांत हे सर्जन आहेत. आई पद्मा या शास्त्रज्ञ आहेत. या दोघांनीही मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या करिअरकडेही अनेकदा दुर्लक्ष केलं. वडील गुकेशला स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन जात असल्याने त्यांचे त्यांच्या व्यवसायाकडे अनेकदा दुर्लक्ष होत होते. मात्र तरीही त्यांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं. आईचंही तसंच. मुलाला चांगल्या सुविधा देण्यासाठी आईनेही अनेकदा त्याग केले. आई-वडिलांच्या सहकार्यामुळेच गुकेश आज ही स्पर्धा जिंकू शकला. त्यामुळेच स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+