Champions Trophy 2025 Semifinal: 6 दिवसांत गतविजेता पाकिस्तान बाहेर; भारत, न्यूझीलंड सेमिफायनलमध्ये
सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्राँफी-२०२५ ही स्पर्धा सुरु आहे. यजमान आणि गतविजेता पाकिस्तान यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आज बाहेर पडला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान व बांग्लादेश हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर गेले. गट अ पाकिस्तानसह भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशचे हे चार संघ आहेत. गुणतालिकेत टॉप-२ मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार होता.

भारत, न्यूझीलंड उपांत्य फेरीत
न्यूझीलंडसह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. दुसऱ्या सामन्यात संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही या दोन्ही संघांना पराभूत केले. भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २००९ मध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला पण त्यानंतरच्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये ते पहिल्या फेरीतच बाहेर पडले.
भारताचा उपांत्य सामना कधी?
भारताचे गटात कोणतेही स्थान असले तरी, ते स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल. पहिला उपांत्य सामना ४ मार्च रोजी होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारताशी कोणता संघ सामना करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. जर भारत आपल्या गटात अव्वल स्थानावर राहिला तर त्याचा सामना गट ब मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल. दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यास, आपल्याला नंबर वन संघाचा सामना करावा लागेल. ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
कधी आहे उपांत्य सामना?
स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी खेळवला जाईल. यामध्ये न्यूझीलंड संघ सहभागी होईल. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल आणि जर तो पोहोचला नाही तर तो लोहारमध्ये खेळवला जाईल. विजेतेपदाची लढत ९ मार्च रोजी होणार आहे. गट फेरीच्या सामन्यांप्रमाणे, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने देखील भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होतील.












Click it and Unblock the Notifications