गुडघ्याला दुखापत, 10 ओव्हर बॅटींग करणं कठीण, धोनी बाबत कोचने केला धक्कादायक खुलासा
MS Dhoni: आयपीएल 2025 च्या या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहत आहोत. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जेव्हा जास्त षटके शिल्लक नसतात तेव्हा तो मैदानावर खेळायला येतो. धोनीला याबद्दल बरीच टीकाही सहन करावी लागत आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात माही सातव्या क्रमांकावर आला. याआधी तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यानंतर सोशल मीडियावर माहीवर बरीच टीका झाली. आता इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचं कारण काय ? याबाबतचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

महेंद्रसिंग धोनीने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिले आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी फिटनेसच्या समस्यांचा उल्लेख केला आहे. फ्लेमिंग म्हणाले की तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे माहीवर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे त्याला वरच्या क्रमात फलंदाजी करणे शक्य नाही. धोनीला अजूनही गुडघ्याचा त्रास आहे.
फ्लेमिंग म्हणाले की, धोनीचे गुडघे आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. तो असा चालू शकत नाही. तो संपूर्ण 10 षटके फलंदाजी करू शकत नाही, म्हणूनच त्याचा फलंदाजीचा क्रम खालचा आहे. धोनीची खेळण्याची स्थिती सामना आणि त्याच्या तंदुरुस्तीच्या आधारे निश्चित केली जाईल.
एमएस धोनीवर सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल
फ्लेमिंगच्या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, धोनी जबरदस्तीने खेळत आहे. त्याची तंदुरुस्ती खराब आहे आणि तो फक्त सुपरस्टार आहे म्हणून फ्रँचायझींमध्ये सामील होत आहे. यामुळे सोशल मीडियावरील एक मोठा वर्ग धोनीवर कायम टीका करत आहे. 43 वर्षांच्या वयानंतरही माही फिटनेसशिवाय खेळत राहिल्याने त्याच्या टीकाकारांची संख्या आता वाढत आहे.
बऱ्याचदा असे म्हटले जाते की, श्रेय घेण्यासाठी धोनी सामन्याच्या शेवटी खेळायला येतो आणि चौकार किंवा षटकार मारून प्रशंसा मिळवतो. जरी खरे कारण त्याची खराब फिटनेस आहे. धोनी ही समस्या कशी सोडवतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
चेन्नईचा संघ पॉवरप्लेमध्ये सामना गमावला
फ्लेमिंग म्हणाले, 'धोनीने यापूर्वी कधीही असे केले नाही. जर तुम्ही पाहिले तर, माही सुमारे १३-१४ षटकांनंतरच मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मैदानावर कोण आहे यावर ते अवलंबून असते. पॉवरप्लेमध्ये आरआरने एका विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या, तर सीएसकेने एक विकेट गमावल्यानंतर फक्त ४२ धावा केल्या. फ्लेमिंगने कबूल केले की त्यांनी पॉवरप्लेमध्ये सामना गमावला.
फ्लेमिंगच्या मते सामन्यातील ट्रेनिंग पॉइंट
सामन्याच्या महत्वाच्या क्षणावर बोलताना फ्लेमिंग म्हणाले 'मला वाटतं रियान परागचा झेल हा सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. दुबे फलंदाजी करत असताना सामना आमच्या बाजूने जात होता, पण वानिंदू हसरंगाने धाडस दाखवले, हे तुम्ही नाकारू शकत नाही. त्याने निश्चितच चेंडू उडवला. कधीकधी जर तुम्ही उडवला जाणारा चेंडू टाकला तर तो तुमच्या संघासाठी हानिकारक ठरू शकतो कारण त्यामुळे मोठे शॉट्स मारले जातात. तसेच हसरंगाकडे असे करण्याचे धाडस होते आणि गायकवाडची विकेट देखील अतिशय हुशारीने घेण्यात आली. म्हणून हसरंगाने संयम राखत चांगली कामगिरी केली.












Click it and Unblock the Notifications