क्रिकेट विश्वात खळबळ! 'या' क्रिकेटपटूने केला 11 महिलांवर बलात्कार; संघटना का दाबतेय प्रकरण!
Cricketer accused of raping 11 women : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नामांकित खेळाडूने तब्बल 11 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर त्याहून धक्कादायक प्रकरण म्हणजे, या गंभीर स्वरुपाचे प्रकरण त्या देशातील क्रिकेट बोर्ड जाणीवपूर्वक दाबून टाकण्याचे काम करत असल्याचे समोर आले. परंतु, अन्यायाला तोंड फुटते असे म्हटले जाते ना, त्याप्रमाणे हे प्रकरण आता जगासमोर आले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या एका खेळाडूवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गयानाच्या रहिवासी असलेल्या या खेळाडूविरुद्ध किमान 11 महिलांनी तक्रार दाखल केली आहे. यापैकी एक पीडित अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते.
कॅरिबियन मीडिया सूत्रांचा दावा आहे की, या क्रिकेटपटूने बलात्कार, लैंगिक शोषण आणि गैरवर्तन असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. असे सांगण्यात आले आहे की, गयाना पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
18 वर्षांच्या मुलीवर बळजबरीने अत्याचार!
एका महिलेने अलीकडेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती, परंतु जबाब नोंदवताना ती भावनिक झाली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच वेळी, दुसऱ्या एका घटनेत, 18 वर्षीय मुलीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, मार्च 2023 मध्ये, क्रिकेटपटूने तिला आपल्यासोबत नेले आणि तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने आरोपीवर विश्वास ठेवला होता, पण आता तिने पूर्णपणे त्या तरुणीचा वापर केला. तिच्यावर अत्याचार केला.
समोर, याप्रकरणावर जेव्हा कैतूर न्यूजने प्रकाश टाकला. तेव्हा आणखी अनेक महिलाही पुढे आल्या. त्यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ चॅट्स, ऑडिओ मेसेजेस, मेडिकल रेकॉर्ड्स आणि इतर पुरावे सादर केले आहेत. काही पीडितांनी असाही आरोप केला आहे की, पोलिसांनी वारंवार चौकशीत त्यांचा छळ केला, परंतु कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
क्रिकेट वेस्ट इंडीज बोर्डाचे निवेदन काय?
जेव्हा एका स्थानिक टीव्ही चॅनेलने क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ला या प्रकरणावर प्रश्न विचारला, तेव्हा बोर्डाकडून सांगण्यात आले की, त्यांना संपूर्ण घटनेची माहिती नाही. CWI चे अध्यक्ष किशोर शैलो म्हणाले, "क्रिकेट वेस्ट इंडीजला या परिस्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही, म्हणून आम्ही सध्या भाष्य करू शकत नाही."
वेस्ट इंडिजच्या सद्याच्या टीममधील आहे खेळाडू!
हे आरोप अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज कसोटी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत आहे. गंभीर आरोपांमुळे बोर्ड अडचणीत आला आहे.
क्रिकेट बोर्डावर आता मोठा दबाव!
आता निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी संघटनेवर दबाव वाढत आहे. हा क्रिकेटपटू सध्याच्या विंडीज संघातील असल्याचेही म्हटले जात आहे परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणाऱ्या संघातील खेळाडूंबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
तो' खेळाडू कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितांनी त्या क्रिकेटरच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून गयानाला परतल्यानंतर या प्रकरणावर कोणीही बोलले नाही. पण एक-दोन दिवसांपासून पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
वेस्ट इंडिज टीम ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यानंतर जेव्हा तो खेळाडू गयानाला परतला, तेव्हा त्याचे 'हिरो' सारखे स्वागत करण्यात आले. पण अजूनपर्यंत त्या खेळाडूचे नाव उघड करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर खेळाडूंच्या नावासंबंधी अनेक तर्कवितर्क उपस्थित केले जात आहेत.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या संघात टीम गयाना कडून तीन क्रिकेटपटू सामिल झाले होते. त्यात शमार जोसेफ, केविल सिंक्लेअर आणि गुडाकेश मोटी होते. या नावांभोवतीच चर्चा करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications