Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युझवेंद्र चहलची नेमणूक कोणत्या मोठ्या सरकारी पदावर ? सरकारकडून दरमहा किती पगार मिळतो?

Yuzvendra Chahal Govt Job: टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यामूळे चर्चेत आहेत. दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इंन्सटावरील दोघांनीही फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे प्रकरण खूपच गंभीर बनलं आहे.

घटस्फोटाच्या अफवांमध्ये दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. युझवेंद्रने धनश्रीसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. धनश्रीने युझवेंद्रला अनफॉलो केले आहे, पण त्याचे फोटो अजून डिलिट केलेल नाहीत. मिळालेल्या माहीतीनुसार घटस्फोट अंतिम आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

yuzvendra chahal

चहल आणि धनश्रीचे लग्न होण्याच्या आधी धनश्रीला कोणी ओळखत नव्हते. ती TikTok वर व्हिडिओ बनवायची. असंही म्हटलं जातं की ती डान्स क्लासेस घेत असे आणि चहलने तिच्याशी संपर्क साधून तिचा विद्यार्थी झाला.

22 डिसेंबर 2020 रोजी झालं लग्न

प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र सिंग चहल यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं आहे. सध्या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत.

घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर चहलच्या समर्थनात त्याचे चाहते मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, चहलने तिच्याशी लग्न नको करायला होते. विचार करूनच हे काम करायचे होते. धनश्री आणि चहल या दोघांकडूनही या प्रकरणावर मौन आहे.

युझवेंद्र चहल आहे सरकारी नोकरदार

टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळून करोडोंची कमाई करणाऱ्या चहलला सरकारकडून पगार म्हणून मोठी रक्कमही मिळते. युझवेंद्र चहल एक सरकारी कर्मचारी आहे. चहलला सरकारकडून दरमहा पगारही मिळतो आणि पदही खूप चांगले आहे. चहल एक सरकारी नोकरदार असल्याचे अनेक लोकांना याबाबत अजून माहिती नाही.

एकदा एका मुलाखतीत चहलने त्याच्या नोकरीबद्दल सांगितले होते. तो आयकर निरीक्षक म्हणून काम करतो. चहलला ही नोकरी स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत मिळाली आहे. क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे चहलला ही नोकरी मिळाली आहे.

युझवेंद्र चहलचा पगार किती आहे?

या पदासाठी चहललाही चांगला पगार मिळतो. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचा ग्रेड पे 4600 रुपये आहे. त्यानुसार दरमहा दिले जाणारे पगार 44,900 ते 1,42,400 रुपयांपर्यंत आहे. या रकमेदरम्यान चहलला पगार म्हणूनही रक्कम मिळते. एका जबाबदार नागरिकाप्रमाणे तो त्याच्या क्रिकेटच्या कमाईतून करही भरतो ही वेगळी बाब आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+