क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही युवराज सिंग करतो कोट्यावधीची कमाई, जाणून घ्या त्याची संपत्ती
Yuvraj Singh Networth: सिक्सर किंग म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. तो 43 वर्षांचा झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही युवीचे चाहते कमी झालेले नाहीत. कर्करोगाने त्रस्त असतानाही 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळताना युवराजने संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. युवराज त्यावेळी टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही युवराज सिंगच्या कमाईवर फारसा काही परिणाम झालेला नाही. तो कोटवधी संपत्तीचा मालक आहे. युवराज सिंगची चंदीगड आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी अलिशान घरे आहेत. याशिवाय त्यांनी स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्यांला त्यातून चांगले उत्पन्न मिळते.

कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी युवराज सिंग स्वतःचे फाऊंडेशन चालवतो. 'युवी कॅन' असं या फाऊंडेशनचं नाव आहे. युवराज सिंगला महागड्या गाड्यांचा शौक असून तो आलिशान जीवन लाइफ जगतो. स्टाईलच्या बाबतीतही युवराज सिंगची तुलना बॉलिवूड कलाकारांशी होऊ शकत नाही. त्याने आपली एक वेगळीच स्टाइल निर्माण केली आहे.
आलिशान लाइफ जगण्याची आवड असलेल्या युवराज सिंगचे गोव्यात ही आलिशान घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंगची एकूण संपत्ती 290 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. युवराज सिंग अजूनही जाहिरातींमधून चांगली कमाई करतो. गाड्यांच्या बाबतीत, त्याच्या गॅरेजमध्ये अनेक अलिशान गाड्या आहेत. यामध्ये बेंटले, BMW X6M, M5E60 यासारख्या लक्झरी गाड्या आहेत. याशिवाय युवराजकडे काही ओडी मॉडेल्सही आहेत. युवराज सिंगकडेही लॅम्बोर्गिनी आहे. युवराजला नेहमीच आलिशान गाड्यांचा शौक आहे.
युवराज सिंग 2016 मध्ये विवाह बंधनात अडकला. 30 नोव्हेंबर रोजी त्याने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. मित्राच्या पार्टीदरम्यान हेजल आणि युवीची मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. पुढे दोघेही एकत्र स्थायिक झाले. भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा युवराज सिंग कसोटी क्रिकेटमध्ये फारसा खेळू शकला नाही. या फॉरमॅटमध्ये त्याने 40 सामने खेळले आणि 1900 धावा केल्या. युवीने एकदिवसीय सामन्यात 304 सामन्यात 8701 धावा आणि टी20 मध्ये 1177 धावा केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications