Smriti Mandhana Net Worth: स्मृती मानधना अशी करते करोडोंची कमाई, बॉयफ्रेंडपेक्षा किती आहे श्रीमंत ?
Smriti Mandhana Net Worth: भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड महिला विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. यासह भारताने 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकण्यात यश मिळवलं आहे. या विजयात स्मृती मंधानाच्या शानदार शतकाचाही समावेश आहे. ज्यामुळे न्यूझीलंडने दिलेले 233 धावांचे लक्ष्य गाठण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला.
स्मृती मानधनाने इतिहास रचला
नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्मृती मंधानाच्या शतकामुळे संघाला मालिकेत विजय मिळवून दिला. यासह मंधाना एकदिवसीय शतकांच्या बाबतीत सर्वाधिक शतके झळकावणारी भारतीय महिला क्रिकेटपटू देखील बनली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शतकासह मंधानाने आता तिच्या 88 सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत 8 शतके झळकावली आहेत. स्मृतीने आतापर्यंत एकूण धावा 45.00 च्या सरासरीने 3,690 धावा केल्या आहेत.

शतकांच्या बाबतीत स्मृती मंधाना आता लॉरा वोल्वार्ड, कॅरेन रोल्टन, स्टेफनी टेलर आणि सोफी डेव्हाईन यांसारख्या महान खेळाडूंची बरोबरी साधली आहे.तसेच शतकांव्यतिरिक्त मंधानाने 27 अर्धशतके देखील झळकावली आहेत. ज्यामध्ये तिची सर्वोच्च वनडे धावसंख्या 136 धावा आहे. भारतीय महिला एकदिवसीय शतक करणाऱ्यांच्या यादीत मंधानानंतर माजी कर्णधार मिताली राज आहे, जिने 232 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 शतके झळकावण्याचा पराक्रम केलेला आहे.
बॉयफ्रेंडपेक्षा किती श्रीमंत ?
स्मृती मानधना ही WPL च्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. आरसीबीने स्मृती मानधना हिला लिलावात 3 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्मृती मानधनाची एकूण संपत्ती 33 कोटी 29 लाख रुपये आहे. तिचा गायक असलेला बॉयफ्रेंड पलाश मुच्छालच्या नेटवर्कबद्दल बोलायचे तर त्याचे नेटवर्क 20 ते 41 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
स्मृती मानधना अशी करते करोडो रुपयाची कमाई
बीसीसीआयच्या करारात स्मृती मानधना A ग्रेड खाली येते. ज्यामुळे तिला 50 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. यासह ती मॅच फी आणि हिरो मोटोकॉर्प, बूस्ट आणि ह्युंदाई यासह विविध ब्रँडसह जाहिरातींमधून मोठी कमाई करते. तसेच जीक्यू इंडिया आणि फायनान्शिअल एक्स्प्रेस सारख्या स्त्रोतांकडूनही ती कमाई करते.












Click it and Unblock the Notifications