शुभमन आणि सारा तेंडुलकर यांच्यात कोण जास्त श्रीमंत ? दोघांच्या संपत्तीत किती आहे फरक, घ्या जाणून
Shubman Gill and Sara Tendulkar: टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यात अफेअर असल्याच्या अनेक बातम्या नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही. गिल आणि सारा यांच्यात काहीतरी चालले आहे की नाही याबद्दल फक्त बातम्या आणि अटकळ आहेत.
टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलचे नाव अनेकवेळा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेले आहे. या सगळ्यामध्ये गिलने आपले सर्व लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले आहे. शुभम त्याच्या खेळात यशस्वी ही झाला आहे. अलिकडेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान शुभमन गिलने आपल्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी सारा तेंडुलकरला अनेक वेळा स्टेडियममध्ये स्पॉट झाली आहे. अलिकडेच ती ऑस्ट्रेलियालाही गेली होती, त्यावेळी तिथे टीम इंडियाची कसोटी मालिका सुरू होती. शुभम गिल आणि सारा तेंडूलकर यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा मागील काही वर्षापासून नेहमीच रंगतात. मात्र अद्याप या चर्चेना दुजोरा मिळाला नाही.शुभम गिल आणि साराच्या वयात फरक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या एकूण संपत्तीतही फरक आहे.
शुभमन गिल आयपीएलमधून करतो करोडोची कमाई
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने शुभमन गिलला मोठ्या रकमेला करारबद्ध केले आहे. तो संघाचा कर्णधार आहे. शुभमला 16 कोटी 50 लाख रुपयांना कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्याला बीसीसीआयच्या ग्रेड ए करारातूनही पैसे मिळतात. तसेच तो टाटा कॅपिटल, सीएट टायर्स सारख्या ब्रँडच्या जाहिराती देखील करतो.
शुभमन गिलचे पंजाबमधील फिरोजपूरमध्ये एक मोठे आलिशान घर आहे, याशिवाय देशाच्या इतर भागातही त्याची मालमत्ता आहे. शुभमन गिलकडे रेंज रोव्हर आणि महिंद्रा थार सारख्या लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. त्यांची एकूण संपत्ती 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जातं. मात्र ही संपत्ती कमी-अधिक असू शकते.
सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती किती आहे?
सचिन तेंडुलकरची मुलगी असूनही साराने स्वतःचे नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घेते. साराने वयाच्या 28 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय देखील चालवते. तिची एकूण संपत्ती जास्त नसली तरी ती 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालकिन आहे. सारा तिचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या फाउंडेशनमध्ये काम करते. तिने लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच ती अनेकदा सोशल मीडियावर ब्रँड्सची जाहिरात करते.












Click it and Unblock the Notifications