'मुझे तो मोहब्बत है' रिंकू सिंगची 'त्या' खास व्यक्तीसाठी पोस्ट, व्यक्त केल्या मनातील भावना
Rinku Singh Instagram Post : कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू आणि स्फोटक फलंदाज रिंकू सिंगला आयपीएल 2025 साठी 13 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. गेल्या हंगामापर्यंत रिंकू सिंगला फक्त 55 लाख रुपये मोजून संघात घेतलं होतं. पण आता रिंकू सिंगला प्रत्येक सीझनसाठी थेट 13 कोटी रुपये मिळणार आहेत. रिंकू सिंगनेही रिटेन ठेवल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. रिंकू सिंगने शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रिंकू सिंगने मनातल्या भावना व्यक्त केल्या
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला सतत शुभेच्छा देत आहेत. रिंकू सिंगनेही KKR सहमालक शाहरुख खानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने शाहरुखबद्दल लिहिले की, 'आपको इनसे प्यार होगा, मुझे तो मोहब्बत है', 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. जगभरात नेहमी प्रेम आणि आनंद पसरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लव्ह यू सर'.
रिंकू होणार कर्णधार?
केकेआर आयपीएल 2024 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर रिंकू सिंगचा पगार 55 लाख रुपयांवरून 13 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून श्रेयस अय्यरच्या बाहेर पडल्यानंतर रिंकू सिंगकडेही कर्णधारपदाचा विचार केला जात आहे. रिंकू सिंग केकेआरचे नेतृत्व करताना दिसल्यास आश्चर्य वाटयला नको.
KKR मध्ये नवीन ओळख मिळाली
रिंकू सिंगची आयपीएल कारकीर्द खूपच रंजक आणि यशस्वी ठरली आहे. त्याने 2017 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2022 मध्ये त्याने काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये वेगवान धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 2023 मध्ये त्याने काही एक उत्तम फिनिशरसह अंतिम षटकांमध्ये मोठी धावसंख्या करण्याची क्षमता सिद्ध केली.












Click it and Unblock the Notifications