Musheer Khan: सर्फराज खानचा भाऊ मुशीर अपघातात जखमी, मोठी अपडेट आली समोर
Musheer Khan Road accident : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ आणि मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मुशीर खानचा भीषण अपघात झाला आहे. मुशीर 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी आझमगड येथील त्याच्या घरातून लखनऊला जात होता. उत्तर प्रदेशमधील कानपूरहून लखनऊला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मुशीर आणि त्याचे वडील-सह-प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत इराणी चषक स्पर्धेसाठी कानपूरहून लखनऊ जात असताना हा अपघातात घडला आहे. त्यांची टोयोटा फॉर्च्युनर गाडी दुभाजकावर आदळून उलटली . मुशीर यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांच्यावर लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुशीरच्या तब्येतीबद्दल रुग्णालयाने दिली माहीती
मुशीर खानच्या तब्येतीबद्दल अपडेट मेदांता हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीन शेअर केले आहे. मेदांताने मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे - 27.09.2024 रोजी रात्री 08:00 वाजता पूर्वाचल एक्सप्रेसवेवर रस्ता अपघातात मुशीर खान जखमी झाला आहे. मुशीरला मानदुखीमुळे मेदांता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं आहे. ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ. धर्मेंद्र सिंग यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचं म्हटलं आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मुशीर खानला लवकरात लवकर मुंबईला शिफ्ट करण्यात येणार आहे. पुढील उपचारासाठी बीसीसीआयने अधिकृत रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाईल. बीसीसीआय आणि एनसीएच्या वैद्यकीय समितीला त्याच्या या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. मुशीर इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळणार होता. यानंतर तो रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबईकडून खेळणार होता. इराणी खेळानंतर मुंबई 11 ऑक्टोबरला बडोद्याविरुद्ध रणजी मोहिमेला सुरुवात करणार होता.
19 वर्षीय मुशीर खानने उत्कृष्ट प्रथम-श्रेणी हंगाम खेळला आहे. 'चार दिवसीय' कसोटी सामन्यांचा समावेश असलेल्या भारत अ संघाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. रणजी उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक आणि अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या मुशीरने भारत ब संघाविरुद्ध भारत अ संघात 181 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची निवड दुलीप करंडकातील कामगिरी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी होणाऱ्या उर्वरित भारत आणि रणजी चॅम्पियन मुंबई यांच्यातील इराणी चषक सामन्याच्या आधारे केली जाणार आहे. जरी काही कसोटी वेगवान गोलंदाजांना आधीच पाठवले गेले असले तरी,मुशीर आणि राजस्थानचा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार ही दोन नावे जवळपास निश्चित आहेत, ज्यांनी सौरभ कुमारला मागे टाकून रवींद्र जडेजा आणि अक्षर यांच्यानंतरचा पुढचा सर्वोत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे.












Click it and Unblock the Notifications