Maharaja trophy final : महाराजा ट्राॅफीचा अंतिम सामना आज, जाणून घ्या केव्हा, कधी लाईव्ह पाहू शकाल?
Maharaja trophy final :महाराजा ट्राॅफी केएससीए टी 20- 2024 मध्ये 30 लीग सामने आणि दोन क्वालिफायर नंतर महामुकाबल्याचा दिवस उजाडला आहे. बेंगळुरू ब्लास्टर्सचा रविवारी म्हैसूर वॉरियर्सशी अंतिम सामना होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. ही हाय-व्होल्टेज अॅक्शन लाइव्ह कधी आणि कुठे पाहू शकता हे याबद्दल जाणून घेऊया.
बेंगळुरू ब्लास्टर्सने शुक्रवारी गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्धचा पहिला उपांत्य सामना नऊ गडी राखून जिंकून फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. म्हैसूर वॉरियर्सने शनिवारी हुबळी टायगर्सवर नऊ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

करुण नायरच्या नेतृत्वाखालील म्हैसूर वॉरियर्स लीग टप्प्यानंतर पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर होती, तर मयंक अग्रवालची बेंगळुरू ब्लास्टर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. आता विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही संघ आमनेसामने येतील.
राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड प्रसिद्ध कृष्णासोबत वॉरियर्समध्ये आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या कृष्णप्पा गौतमने यंदाही म्हैसूर वॉरियर्सला जेतेपदाचा प्रबळ दावेदार बनवले आहे.
महाराजा ट्रॉफी फायनलचे थेट प्रक्षेपण कोणते टीव्ही चॅनेल करतील?
महाराजा ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्याचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स कन्नड वर प्रसारित केला जाईल.
भारतात महाराजा ट्रॉफी फायनलचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
महाराजा ट्रॉफी T20 2024 ची अंतिम फेरी फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह-स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.
म्हैसूर वॉरियर्स टीम: एसयू कार्तिक, कोडांडा अजित कार्तिक, करुण नायर (कर्णधार), श्रीनिवास शरथ, सुमित कुमार (यष्टीरक्षक), मनोज भंडागे, जगदीशा सुचित, हर्षिल धर्मानी, कृष्णप्पा गौथम, विद्याधर पाटील, धनुष गौडा, प्रिसिध कृष्णा, मुरलीधर वेंकटेश. किशन बेदारे, सागर गौतम, गौतम मिश्रा, ईजे जास्पर, दीपक देवाडिगा, समित द्रविड, स्मयन श्रीवास्तव, सरफराज अश्रफ.
बंगळुरू ब्लास्टर्स टीम : एलआर चेतन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भुवन राजू, सूरज आहुजा (यष्टीरक्षक), शुभांग हेगडे, अनिरुद्ध जोशी, क्रांती कुमार, नवीन एमजी, मोहसिन खान, लविश कौशल, संतोष सिंग, डेगा निश्चल, प्रतिक जैन, शिवकुमार रक्षित, आदित्य गोयल, वरुण राव टीएन, निरंजन नाईक, वरुण कुमार एचसी, शिखर शेट्टी, भीमराव नवले(Maharaja trophy final :)












Click it and Unblock the Notifications