Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कॉंग्रेस नेत्या- रोहित शर्माला जाड्या म्हणाल्या, नंतर पोस्ट डिलीट मारली, BJP आक्रमक, नेमका वाद काय

Rohit Sharma Fat Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवरुन कायमच चर्चा होत असते. पण जेव्हा जेव्हा त्याच्या फिटनेसवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तेव्हा तेव्हा रोहित शर्माची बॅट तळपलेली आपण पाहतोच. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माची व्यक्तिगत कामगिरी चांगली नसली तरी त्याच्या नेतृत्वातील टीम मात्र चांगलीच काम करत आलेली आहे. अशातच, रोहित शर्माच्या फिटनेसवरुन राजकीय वाद रंगल्याचे देखील पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी जे विधान केले, त्यावरुन देशभरात चांगलाच वाद पेटला आहे. तर कॉंग्रेस नेत्यांना आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर मिळाले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले- एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे, त्याने वजन कमी केले पाहिजे. शमा मोहम्मद म्हणाल्या की, रहित हा भारताचा सर्वात निराशाजनक कर्णधार आहे. भाजपने काँग्रेस प्रवक्त्यांच्या विधानाला स्वनिर्मित चॅम्पियन (रोहित) चा अपमान आणि बॉडी शेमिंग म्हटले आहे. तथापि, नंतर काँग्रेसने म्हटले की आमचा पक्ष क्रीडा व्यक्तिमत्त्वांचा आदर करतो. पक्षाने शमाला तिच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. यानंतर शमाने पोस्ट काढून टाकल्या.

Rohit Sharma Fat

काय पोस्ट केली होती शमा मोहम्मद यांनी?

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माची तुलना माजी भारतीय क्रिकेट दिग्गजांशी केली. त्यांनी लिहिले की, 'सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कपिल देव आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या तुलनेत रोहित शर्मामध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे? तो एक सरासरी खेळाडू आणि कर्णधार आहे, त्याला योगायोगाने भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले.

काँग्रेस म्हणाली- भविष्यात काळजी घ्या

शमा मोहम्मद यांनी दिलेल्या विधानावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी शमा यांच्या विधानाचे समर्थन केले नाही. ते म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एका क्रिकेट दिग्गजाबद्दल काही विधाने केली आहेत, जी पक्षाच्या विचारसरणीच्या विरुद्ध होती. त्याला X मधून या पोस्ट काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टीकेनंतर शमा यांनी दिले स्पष्टीकरण

टीका झाल्यावर शमा मोहम्मद म्हणाल्या, 'मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केले नाही. त्या ट्विटमध्ये मी म्हटले होते की एक खेळाडू असल्याने त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाहीये. मी त्याला एक अप्रभावी कर्णधार म्हटले कारण मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली होती.

तृणमुल कॉंग्रेस खासदारांनी शमा मोहम्मद यांचे समर्थन केले

दरम्यान, शमा मोहम्मद यांच्या विधाना काही लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले की, शमा यांनी काहीही चुकीचे म्हटले नाही. वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना रॉय म्हणाले, 'मी ऐकले आहे की रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने शतक केले, पण त्याशिवाय तो 2, 3, 4 किंवा 5 धावा करून बाद झाला. तो संघात नसावा. इतर खेळाडू चांगले खेळत असल्याने भारत जिंकतो, पण कर्णधाराचे योगदान दिसत नाही. म्हणून, शमा मोहम्मद यांनी जे म्हटले आहे ते बरोबर आहे.

भाजपने राहुल गांधींच्या नेतृत्वावरुन टोला लगावला

काँग्रेस प्रवक्त्यांच्या या विधानांवर भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले- राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 90 निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या कर्णधारपदाला निरुपयोगी म्हणत आहेत. पूनावाला यांनी रोहितच्या ट्रॅक रेकॉर्डचे कौतुक केले आणि त्याच्या टी-20 विश्वचषक विजयाचा उल्लेख केला.

कॉंग्रेस कायमच खेळाडूंचा अपमान करत आलेय- राधिका खेरा

काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्या राधिका खेरा यांनी आरोप केला की काँग्रेसने अनेक दशकांपासून खेळाडूंचा अपमान केला आहे आणि आता ते एका क्रिकेट दिग्गजाची खिल्ली उडवत आहेत. ही तीच काँग्रेस आहे जी दशकांपासून खेळाडूंचा अपमान करत होती, त्यांना मान्यता देत नव्हती आणि आता स्वतः बनवलेल्या चॅम्पियनची खिल्ली उडवत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+