Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kuldeep yadav Net Worth: वडील वीटभट्टीवर काम करायचे, आज कुलदीप यादव आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

Kuldeep yadav Net Worth: भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जादूने भारत विरुध्द न्युझीलंडच्या अंतिम सामन्यात दोन महत्वाच्या विकेट बळकावल्या आहेत. कुलदीप यादवने आपल्या फिरकीन न्युझीलंड संघाचा स्टार खेळाडू रचिन रविंद्रला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर दुस-या षटकात त्याने केन विल्यमसनला झेलबाद केलं आहे.

"चायनामॅन" म्हणून गोलंदाजीसाठी कुलदीपची खास ओळख आहे. उजव्या हाताने फिरकी गोलंदाज लेग स्पिन करतो त्याप्रमाणे डाव्या हाताने चेंडू फिरवणे हे एक उत्कृष्ट गोलंदाजीचे तंत्र त्यांच्याकडे आहे. कुलदीप यादवच्या नावावरही अनेक मोठे विक्रम ही आहेत.

Kuldeep Yadav

लहानपणापासूनच होते वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न

कानपूरमधील वीटभट्टीवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा कुलदीपला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वेगवान गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न होते, कारण त्याच्यावर महान पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम आणि भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांचा खूप प्रभाव होता. दरम्यान त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली जेव्हा त्याने फिरकी गोलंदाजी स्वीकारली.

2017 मध्ये भारतीय संघात पदार्पण

लेग स्पिन आणि मनगटाच्या फिरकी गोलंदाजीत कुलदीपने कौशल्य मिळवले, जे त्याचे खास वैशिष्ट्य बनले. 2017 मध्ये कुलदीप यादवने भारतीय क्रिकेट संघात आपली खास ओळख निर्माण केली. 2017 मध्येच त्याने वनडे, कसोटी आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. कुलदीप यादवला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये (ODI आणि T20) विशेष ओळख मिळाली. जिथे त्याने आपल्या हुशारीने आणि कौशल्याने फलंदाजांना चांगलेच परेशान केलं. वनडेत कुलदीपने आतापर्यंत दोन वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

बीसीसीआयकडून इतके पैसे मिळतात

कुलदीप यादवला एका T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात तर एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. जवळपास 2 वर्षे संघात आणि बाहेर राहिल्यानंतर कुलदीप पुन्हा एकदा पूर्ण फॉर्ममध्ये परतला आहे. कुलदीप यादव भारतासाठी मॅच विनर खेळाडू म्हणून उदयास आला आहे.

कुलदीप यादवची एकूण संपत्ती किती आहे?

कुलदीप यादवची एकूण संपत्ती 40 कोटींहून अधिक आहे. त्याच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) ग्रेड बी करार आहे. या करार अंतर्गत त्याला दरवर्षी 3 कोटी रुपये मिळतात. याशिवाय कुलदीपला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले आहे. त्यासाठी त्याला 13.25 कोटी रुपये दिले आहेत. कुलदीपने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी दमदार कामगिरी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+