Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियाची 'भिंत' ढासळली : रोहित-विराटनंतर टेस्ट स्पेशालिस्ट 'या' खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

Cheteshwar Pujara Retirement : महान फलंदाज राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाची नवी "भिंत" म्हणून ज्याची ओळख होती, तो खेळाडू म्हणजे चेतेश्वर पुजारा.

संयम, एकाग्रता आणि कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असणारी कणखर वृत्ती या गुणांमुळे पुजाराने भारतीय क्रिकेटमध्ये एक खास स्थान निर्माण केले होते. मात्र, आता ही 'भिंत' ढासळली आहे.

भारताचा हा 'टेस्ट स्पेशालिस्ट' फलंदाज चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच व्यावसायिक घरेलू क्रिकेटमध्येही आता तो दिसणार नाही.

Cheteshwar Pujara Retirement

भावनिक पत्र लिहित केली घोषणा

चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियाद्वारे आपली निवृत्ती जाहीर करताना एक भावनिक पत्र लिहिले. आपल्या भावना व्यक्त करताना त्याने लिहिले, "भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणं अशक्य आहे."

प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो, असे सांगत त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्याने पुढे लिहिले, "पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे.

मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!"

पुजाराने 2023 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतासाठी शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते.

चेतेश्वर पुजाराची प्रभावी कसोटी कारकीर्द

चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते 2023 पर्यंत, तब्बल एका दशकाहून अधिक काळ तो भारताच्या कसोटी संघाचा कणा राहिला. त्याला प्रामुख्याने 'टेस्ट स्पेशालिस्ट' म्हणूनच ओळख मिळाली, कारण त्याची फलंदाजीची शैली कसोटी क्रिकेटसाठी अगदी योग्य होती.

पुजाऱ्याच्या आकडेवारीवर टाका एक नजर!

  • कसोटी सामने: 103
  • कसोटी धावा: 7195
  • शतके: 19
  • अर्धशतके: 35
  • द्विशतके: 3

या दरम्यान, तो टीम इंडियासाठी अनेक ऐतिहासिक विजय आणि महत्त्वपूर्ण ड्रॉ मिळवण्यास मदतगार ठरला. ऑस्ट्रेलियातील त्याच्या अनेक महत्त्वपूर्ण खेळी, विशेषतः 2018-19 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील त्याचे प्रदर्शन, त्याला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवून देते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+