Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs Nz यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईला जायचे असेल तर किती येईल खर्च ? घ्या जाणून

Champions Trophy Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ फायनल पोहोचला आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण ऑफ्रिकेच्या संघाचा मोठा पराभव केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे.

हा सामना 9 मार्च 2025 रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ 25 वर्षांनंतर आमनेसामने येणार आहेत. याआधी 2000 मध्ये न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून हे विजेतेपद जिंकले होते.

india vs new zealand match

भारताने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने या संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच सामना गमावला आहे तोही भारताकडून... अशा परिस्थितीत हा अंतिम सामना खूप रंजक ठरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी पाहून भारतीय चाहते हा सामना लाईव्ह पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अनेक क्रिकेटप्रेमी अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईला जाण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हालाही अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईला जायचे असेल आणि विमान तिकिट आणि हॉटेलच्या खर्चाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला दुबईला जाण्याच्या संपूर्ण बजेटची माहिती जाणून घेऊया.

दुबईला जाण्यापूर्वी तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची तिकिटे काढावी लागतील. यासाठी, तुम्ही तुमची तिकिटे आधीच ऑनलाइन बुक करावीत आणि नंतर तुमचा प्लॅन बनवावा.

दिल्ली ते दुबई भाडे किती ?

दिल्ली ते दुबई या विमान प्रवासाचे भाडे अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की प्रवास वेळ, विमान सेवा आणि बुकिंग वेळ. साधारणपणे दिल्ली ते दुबई विमान प्रवास खूपच परवडणारा असतो, विशेषतः जर तुम्ही नॉन-स्टॉप विमान प्रवास करत असाल तर. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या एक दिवस आधी 8 मार्चचे तिकीट खरेदी करावे, ज्याचे भाडे सध्या 14 ते 15 हजार रुपये आहे. म्हणजे जाण्याचा आणि परतीचा भाडे एकत्र केलं तर 28 ते 30 हजार रुपये लागतील.

एअर इंडिया, एमिरेट्स, इंडिगो आणि फ्लायदुबई सारख्या प्रमुख विमान कंपन्या दिल्ली ते दुबई नियमित उड्डाणे चालवतात. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाची किंमत 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत असू शकते, परंतु जर तुम्हाला चांगली ऑफर किंवा सूट मिळाली तर किंमत 10,000 पर्यंत कमी होऊ शकते. जर तुम्हाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करायचा असेल तर भाडे 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत असू शकते.

दुबई हॉटेलचा खर्च

दुबईमध्ये भरपूर हॉटेल्स आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार हॉटेल सहजपणे निवडू शकता. येथे सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, लक्झरी हॉटेल्सपासून ते बजेट फ्रेंडली हॉटेल्सपर्यंत.

- लक्झरी हॉटेल्स (5 स्टार): दुबईमध्ये बुर्ज अल अरब, अटलांटिस द पाम आणि जेए मरीना बीच रिसॉर्ट सारखी आलिशान हॉटेल्स आहेत. त्यांचा खर्च प्रति रात्र 15,000 ते 50,000 पर्यंत असू शकतो.

- मध्यम श्रेणीची हॉटेल्स (3 ते 4 स्टार): जर तुम्ही अधिक परवडणारा पर्याय शोधत असाल, तर ग्रँड हयात दुबई, शेरेटन दुबई आणि रोटाना हॉटेल्स सारख्या मध्यम श्रेणीच्या हॉटेल्सची किंमत प्रति रात्र 7,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

- बजेट फ्रेंडली हॉटेल्स (1 ते 2 स्टार): दुबईमध्ये बजेट प्रवाशांसाठी अनेक चांगली आणि स्वच्छ हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 3,000 ते 7,000 रुपये दरम्यान असू शकते. तुम्ही दुबईमध्ये आधीच हॉटेल रूम बुक करू शकता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याची तिकिटे कशी खरेदी करावी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यासाठी तिकिटांसाठी गर्दी आणखी एका पातळीवर पोहोचली आहे कारण ४ मार्च रोजी तिकीट विक्री सुरू होताच 1,00,000 हून अधिक चाहत्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती.

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याची तिकिटे 12 श्रेणींमध्ये विक्रीसाठी होती, ज्यात 12,000 दिरहम आसनांसाठी (अंदाजे 3,00,000 रुपये) लक्झरी तिकिटे समाविष्ट होती. जे खिडकी उघडताच अवघ्या दोन तासांत विकले गेले. सर्वात स्वस्त तिकिटे, ज्यांची किंमत AED 250 (अंदाजे 5,940 रुपये) होती, ती देखील विकली गेली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+