Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SA vs NZ : न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव; आता फायनलमध्ये भारतासोबत भिडणार!

Champions Trophy 2025, 2 nd Semi-final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा दुसरा सेमी फायनल न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 363 धावांचे लक्ष्य होते, त्यासमोर त्यांचे फलंदाज असहाय्य दिसत होते. मोठ्या सामन्यात आफ्रिकन संघ पुन्हा एकदा चोकर असल्याचे सिद्ध झाले. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा विजेतेपदाचा सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्यांनी रायन रिकेल्टन (१७) चा बळी गमावला, जो मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर मायकेल ब्रेसवेलने झेलबाद केला. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी स्वीकारली. बावुमा आणि दुसान यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. बावुमाने ७१ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या. बावुमाला किवी कर्णधार मिशेल सँटनरने बाद केले.

SA Vs NZ

बुधवारी, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 6 गडी बाद 362 धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 356 धावा केल्या होत्या.

आफ्रिकन संघाकडून, रचिन रवींद्र (108 धावा) आणि केन विल्यमसन (102 धावा) यांनी शतके झळकावली, तर डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स अर्धशतक करण्यात अपयशी ठरले. दोघांनीही 49-49 धावा केल्या. लुंगी एनगिडीने 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने 2 विकेट घेतल्या. वेन मुल्डरने एक विकेट घेतली.

SA Vs NZ

दोन्ही संघांचा प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, रसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन मुल्डर, मार्को जानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ'रोर्क.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+