SA vs NZ Semi Final, 2nd Semi-Final : न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकला, पहिल्यांदा करणार बॅटींग
South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुध्द न्यूझीलंड यांच्यात आज बुधवारी (ता. 5 मार्च) दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा महत्त्वाचा सामना बुधवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. विजयी संघ 9 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताशी भिडेल. आजचा सामना नियोजित वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल, दोन्ही कर्णधार टॉससाठी तीस मिनिटे आधी मैदानात आले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार मिशेल सँटनर म्हणाला, आम्ही प्रथम फलंदाजी करू, विकेट चांगली दिसतेय. थोडे सुखा दिसतोय. देशाचे नेतृत्व करणे हा आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले क्रिकेट खेळणे आहे. आमची टीम सारखीच आहे. शेवटचा सामना परदेशी परिस्थितीत होता, आम्ही तिरंगी मालिकेत येथे काही सामने खेळलो आहोत. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमा म्हणाला, आम्हाला फारशी काळजी नाही, पण फलंदाजीला प्राधान्य द्यायला हवे होते. फक्त एक बदल, मी स्वतः, मला खूप बरे वाटते. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतून आम्ही खूप काही शिकलो आहोत. आपल्याला महत्त्वाच्या क्षणी जिंकण्याची गरज आहे.
दक्षिण आफ्रिका संघ: रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
न्यूझीलंड संघ : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क.












Click it and Unblock the Notifications