Champions Trophy- 2025 : बक्षिसाची रक्कम 53 टक्क्यांनी वाढवली; शेवटचा संघही नेणार 'एवढे' कोटी
Champions Trophy 2025- चॅम्पियन ट्रॅाफी २०२५ आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसांची रक्कम आज जाहीर केली. आठ संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी पैशाचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे. मागील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत यंदा बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांनी घसघशीत वाढ करण्यात आली आहे. अगदी शेवटचा संघही मालामाल होणार आहे.

किती मिळेल रक्कम
यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी ही तब्बल आठ वर्षानंत खेळविली जात आहे. यापूर्वी ही स्पर्धा २०१७ ला खेळविण्यात आली होती. यंदा बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याला एकूण ६.९ दशलक्ष डॉलर्सच्या म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १० कोटी रुपये मिळणार आहेत.
ग्रुप स्टेजमध्ये पैसाच पैसा
ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांनाही रिकाम्या हाताने जावे लागणार नाही. पाचव्या व सहाव्या क्रमांकावर असलेल्या संघांना ३.५ लाख डाँलर्स म्हणजेच अंदाजे तीन कोटी रुपये मिळतील. तर सातव्या व आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १ लाख ४० हजार डाँलर्स म्हणजेच १ कोटी २० लाख रुपये मिळतील. याशिवाय ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी ३४ हजार डाँलर्स म्हणजेच अंदाजे ३० लाख रुपये मिळतील. दुसरीकडे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला १ लाख २५ हजार डाँलर्स म्हणजेच अंदाजे एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.












Click it and Unblock the Notifications