Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PAK Vs BAN : पाकिस्तानच्या शेवटच्या सामन्यात पावसाच्या सरी कोसळणार की धावांचा पाऊस पडणार ?

champions trophy 2025, Pakistan vs Bangladesh : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 9 वा सामना पाकिस्तान विरुध्द बांग्लादेश यांच्यात उद्या म्हणजे (ता.27 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये यजमान संघ पाकिस्तान संघाने सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर आता त्यांचा तिसरा सामना उद्या बांगलादेशसोबत होणार आहे. हा सामना रावळपिंडीतील पिंडी स्टेडियममध्ये होणार आहे.

या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व मोहम्मद रिझवान करणार आहे. बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याचा विशेष काही परिणाम होणार नाही.

rawalpindi cricket stadium

दरम्यान पाकिस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही संघांसाठी चालू स्पर्धेतील हा शेवटचा सामना असेल. पाकिस्तान आणि बांगलादेश हे त्यांचे पहिले दोन गट सामने गमावून आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघांना भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही संघापैकी कोणाही सामना जिंकला तरी ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहेत.

रावळपिंडी स्टेडियम हवामान आणि पिच रिपोर्ट ?

रावळपिंडीतील पिंडी खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ही सपाट खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूपच धोकादायक आहे. फलंदाज या खेळपट्टीवर बॅटने भरपूर धावांचा पाऊस पडू शकतो. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, पण सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फलंदाजांना मदत मिळते. फिरकी गोलंदाज मध्यंतरी देखील प्रभावी ठरू शकतात. या सामन्यात पावसाची शक्यता आहे.

रावळपिंडी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात कमी धावसंख्येचा सामना खेळवण्यात आला होता, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना काल याच मैदानावर खेळवण्यात येणार होता परंतु पावसामुळे सामन्यात नाणेफेक होऊ शकली नाही. २७ फेब्रुवारी रोजी रावळपिंडीतील हवामान थंड असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघाच्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. यावेळी तापमान 12 अंश ते 17 अंशांपर्यंत असू शकते.

बांगलादेश संघ- नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.

पाकिस्तान संघ- मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+