Pak vs Ban : पाक विरुद्ध बांग्लादेश यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटचा सामना, कधी, कुठे पाहायचा

Champions Trophy 2025, Pakistan vs Bangladesh : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 9 व्या सामन्यात पाकिस्तान विरुध्द बांग्लादेश संघ उद्या म्हणजे (ता.27 फेब्रुवारी) रोजी आमनेसामने येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये यजमान संघ पाकिस्तान सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर आता त्यांचा तिसरा उद्या बांगलादेशसोबत होणार आहे. हा रोमांचक सामना रावळपिंडीतील पिंडी स्टेडियममध्ये होणार आहे.

या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व मोहम्मद रिझवान करणार आहे तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याचा विशेष परिणाम होणार नाही.

Pakistan vs Bangladesh

दरम्यान पाकिस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही संघांसाठी चालू स्पर्धेतील हा शेवटचा सामना असेल. पाकिस्तान आणि बांगलादेश हे त्यांचे पहिले दोन गट सामने गमावून आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघांना भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही संघापैकी कोणाही सामना जिंकला तरी ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहेत.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हेड टू हेड रिकॉर्ड

एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड सामन्यांच्या रेकॉर्डनुसार पाकिस्तानने या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंतची स्पर्धा मोठ्या प्रमाणात एकतर्फी राहिली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 39 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने 34 सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, बांगलादेशने आतापर्यंत फक्त 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळलेले सर्व 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

AFG vs ENG : तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर

1. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना कधी होणार?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना शनिवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे.

2. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना कुठे होणार?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रावळपिंडीतील पिंडी स्टेडियममध्ये होणार आहे.

3. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.

4. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना भारतात टीव्हीवर कुठे पाहायचा?

पाकिस्तान आणि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी सामना शनिवारी (27 फेब्रुवारी 2025) रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता JioStar नेटवर्क्सच्या स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रसारणासह सुरू होईल, तर JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.

बांगलादेश संघ- नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.

पाकिस्तान संघ- मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+