NZ vs SA Pitch Report: लाहोरची खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल! द. आफ्रिका-न्युझीलंड सामन्यात पाऊस पडेल का
Champions Trophy 2025 New Zealand vs South Africa : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मोठा विजय प्राप्त केला. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर आता क्रीडा रसिकांना दुसऱ्या उपांत्य फेरीचे वेध लागले आहे. दुसरा उपांत्य सामन्यासाठी लाहोरचे गद्दाफी स्टेडीयम सज्ज आहे. दुसरा उपांत्य सामना आज 5 मार्च 2025 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी अडीच वाजता होणार आहे.
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. 5 मार्च रोजी दोन्ही संघ एकमेकांशी आमने-सामने भिडतील. या सामन्यात जो विजयी होईल तो भारताविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. फायनलचा सामना 9 मार्च 2025 रोजी होणार आहे.

चॅम्पियन ट्राॅफीचा यंदाचा हवामानाचा अंदाज पाहता यापुर्वी काही लढतीत पावसाचे सावट होते तर काही सामने पावसाने वाया गेले आहेत. आज उपांत्य फेरीतील महत्वाचा सामना आहे. या सामन्यात पाऊस पडेल का, जर पाऊस पडला तर पुढे काय, हवामान कसे आहे आणि लाहोरमधील खेळपट्टी कशी असणार? हे प्रश्न क्रीडा रसिकांना आहेत, चला आपण याच विषयावर माहिती घेऊया.
अ गटात न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने ब गटात पहिले स्थान पटकावले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याचा सामना भारतीय संघासोबत होणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू पाहत असताना, त्यांना आशा आहे की त्यांना स्वच्छ हवामान आणि खेळण्यासाठी चांगली खेळपट्टी मिळेल.
गद्दाफी स्टेडियम खेळपट्टी अहवाल
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधील खेळपट्टी सामान्यत: फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लाहोरमध्ये उच्च धावांचा सामना उभय संघात होऊ शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकतो पण रन चेस करतानाही हीच परिस्थिती राहू शकते.
CT 2025 NZ vs SA :पावसाचा अंदाज आहे का?
लाहोरमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला आणि त्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचा खेळ वाया गेला. मात्र, उपांत्य फेरीतील आजच्या दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नसून उपांत्य फेरीसाठी हवामान स्वच्छ दिसत आहे. तापमान 20-अंशाच्या आसपास असेल. ते थोडे थंड आहे त्यामुळे संध्याकाळी जास्त दव असू शकते.
गद्दाफी क्रिकेट स्टेडियम ODI आकडेवारी
- एकूण सामने - 76
- प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांने जिंकलेले सामने - 38
- द्वितीय फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले सामने - 36
- पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या - 256
- दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या - 220
NZ vs SA प्लेईंग 11
दक्षिण आफ्रिका - रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जॉर्ज लिंडे, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
न्यूझीलंड - विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सॅन्टनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल ओ'रुर्के












Click it and Unblock the Notifications