Champions Trophy 2025 : पंच नितीन मेमन यांचा पाकिस्तानला जाण्यास नकार; मोठ्ठं कारण आलं समोर...
Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राँफीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारतीय पंच नितीन मेनन यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या पंचांच्या यादीत त्यांचा समावेश नव्हता. त्याच्या आधी भारतीय संघानेही पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. आता हा भारतीय पंच नितीन मेमनने पीसीबीला दुसऱ्यांदा मोठा धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.

नेमके काय आहे कारण?
भारतीय पंच नितीन मेमन यांनी पाकिस्तानला जायला नकार दिला. पीटीआयने ही माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय पंच नितीन मेनन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले नितीन हे एकमेव भारतीय पंच आहेत. नितीन मेनन यांनी ४० कसोटी, ७५ एकदिवसीय आणि ७५ टी-२० सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. याशिवाय, त्याने १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. मात्र तेच आता पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत.
A world-class officiating team featuring 12 umpires and 3 match referees is set for the 2025 #ChampionsTrophy 🏏
— ICC (@ICC) February 5, 2025
Details 👇 https://t.co/z3tQ8vVQiS
पंचांची यादी जाहीर
भारतीय पंच नितीन मेमन यांच्या नकारानंतर आयसीसीने नवीन पंचांची यादी जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण पंच म्हणून काम पाहणार आहे हे त्यांनी जाहीर केले. या यादीत १२ पंच आणि ३ सामनाधिकारी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये कोणत्याही भारतीय पंचाचा समावेश नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पंच म्हणून काम करणारे पंच असे: कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, अहसान रझा, पॉल रायफेल, शराफुद्दुल्लाह इब्ने शाहिद, रॉडनी टकर, अॅलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन
तर सामनाधिकारी: डेव्हिड बून, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट












Click it and Unblock the Notifications