पाकिस्तान ऑलआऊट, भारताला दिले 242 धावांचे टारगेट; सौदची फिफ्टी, कुलदीपने घेतल्या 3 विकेट्स
Champions Trophy 2025, Pakistan gave Team India a target of 242 runs : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला 242 धावांचे लक्ष्य दिले आहे.
पाकिस्तानकडून संघाकडून सौद शकीलने एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने 62 धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (46) सोबत 104 धावांची भागीदारी केली.

पाकिस्तान संघाला कसे केले गारद?
सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना १-१ यश मिळाले. २ फलंदाज धावबाद झाले.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, नाणेफेकीला फारसे महत्त्व नाही. तथापि, ही खेळपट्टी नंतर मंदावू शकते.
राणाने रिझवानचा झेल सोडला
पाकिस्तानी डावाच्या 33 व्या षटकात रिझवानला जीवदान मिळाले. इथे, हार्दिक पंड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, रिझवान पुढे आला आणि त्याने मोठा शॉट खेळला. हर्षित राणाने लाँग ऑनवर मागे धावून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. मात्र, पुढच्याच षटकात रिझवानला अक्षर पटेलने बोल्ड केले. रिझवान ४६ धावा करून बाद झाला.
प्लेइंग- 11 दोन्ही संघाचे
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इमाम उल हक, सौद शकील, बाबर आझम, सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.












Click it and Unblock the Notifications